Mumbai Crime News : 21 वर्षे फरार आरोपी अटकेत, न्यायालयात वारंवार गैरहजर रहात असल्याने फरारी घोषित
Mumbai Crime News : चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीला तब्बल 21 वर्षानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
मुंबई :- चोरीच्या गुन्ह्यात Robbery Case न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीला तब्बल 21 वर्षानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पायधुनी पोलीस ठाण्यात Paidhuni Police Station कलम 380,457,34 भादवि प्रमाणे गुन्ह दाखल आहेत. त्याच्या विरोधात मांझगाव (शिवडी) न्यायालयात खटला चालू होता. परंतु आरोपी सातत्याने सुनावणीच्या दरम्यान गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याला फरारी घोषित करण्यात आली होते.मस्तान इब्राहिम शेख याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी 2 रे न्यायालय यांनी फरार घोषित केले होते. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाळ आणि त्यांच्या पथकाला तांत्रिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना आरोपी मस्तान इब्राहिम शेख (मुळगाव चेन्नई) असून तो वारंवार आपले वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याची माहिती मिळवून आली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे 23 ऑक्टोबर च्या मध्यरात्री आरोपी मस्तान धारावी, मुंबई या परिसरात येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याआधारे सापळा रचून फरार आरोपी मस्तान इब्राहिम शेख याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी करिता आरोपी मस्तान याला पायधुनी पोलिस ठाण्यात ताब्यात दिले आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख , पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – 2. डॉ. मोहितकुमार गर्ग सहाय्यक पोलीस आयुक्त पायधुनी विभाग ज्योत्सना रासम, पायधुनी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाळकृष्ण देशमुख पोलीस निरीक्षक संतोष गसम (गुन्हे) यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक अनिल वायाळ, पोलीस हवालदार इरफान खान, शिरवाडकर, दिपक निकम, शंकर गठोड, मुल्ला, पोलीस शिपाई नितेश घोडे, मोकल यांनी केली आहे. Mumbai Latest Crime News