Kavediya Jewelers News | कावेडिया ज्वेलर्सला कोट्यावधींचा गंडा घालणारा स्टोर मॅनेजर गजाआड !
- तब्बल ४ किलो ७०० ग्रॅम सोन्याची अफरातफर
- मुद्देमाल प्रकरणी अनेक सराफा व्यावसायिकांची चौकशी ?
पुणे, दि. २३ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर Kavediya Jewelers News
Kavediya Jewelers News | रविवार पेठ, गोविंद हलवाई चौकात सुवर्ण पेढीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कावेडिया ज्वेलर्स येथे विश्वासू स्टोर मॅनेजरकडूनच कोट्यावधीचे सोने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. कोट्यावधींचा गंडा घालणारा स्टोर मॅनेजरला पुणे पोलिसांनी गजाआड केले आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी स्टोर मॅनेजर विपुल कांतीलाल गुंदेचा, वय ४६ वर्ष, रा. सूर्य प्रकाश सोसायटी, मार्केटयार्ड पुणे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. Kavediya Jewelers News
कावेडिया ज्वेलर्सचे फिर्यादी संचालक नितीन पुष्पराज कावेडिया यांनी ४ किलो ७०० ग्रॅम सोने चोरी झाल्याबाबत फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. यावरून गुरन. २१९/२०२४ बीएनएस ३०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
संशयित आरोपी विपुल गुंदेचा याने मुद्देमाल कोणाला विक्री केला याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे सूत्रांकडून समजते.