Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी, छगन भुजबळांसह या नेत्यांना तिकीट
Ajit Pawar NCP Candidate List : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी 38 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, छगन भुजबळ आदींची नावे आहेत.
मुंबई :- अजित पवार Ajit Pawar NCP Candidate List यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी 38 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीत येवल्यातून छगन भुजबळ आणि कागलमधून हसन मुश्रीफ यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचवेळी अजित पवार स्वतः बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय कोपुरगावमधून आशुतोष काळे, अकोलेतून किरण लहामटे, बसमतमधून चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूणमधून शेखर निकम आणि मावळमधून सुनील शेळके यांना तिकीट देण्यात आले आहे. तर आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, परळीतून धनंजय मुंडे, दिंडोरीतून नरहरी झिरवळ रिंगणात आहेत.
अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मरावबाबा आत्राम, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, अमळनेरमधून अनिल भाईदास पाटील, उदगीरमधून संजय बनसोडे, अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले, माजलगामधून प्रकाशदादा सोळंके, वाईमधून मार्कंड पाटील, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीने खेड आळंदीतून दिलीप मोहिते, अहमदनगर शहरातून संग्राम जगताप, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, अहमदपूरमधून बाबासाहेब पाटील, शहापूरमधून दौलत दरोडा, पिंपरीतून अण्णा बनसोडे आणि कळवणमधून नितीन पवार यांना उमेदवारी दिली आहे.
जुन्नरमधून अतुल बेनके, मोहोळमधून यशवंत विठ्ठल माने, हडपसरमधून चेतन तुपे, देवळालीतून सरोज अहिरे, चंदगडमधून राजेश पाटील, इगतपुरीतून हिरामण खोसकर, तुमसरमधून राजू कारेमोरे, पुसदमधून इंद्रनील नाईक, अमरावती शहरातून सुलभा खोडके, नवापूर भरत गावित, पाथरी येथील निर्मला उत्तमराव विटेकर यांना पाथरीतून तर नजीब मुल्ला यांना मुंब्रा कळव्यातून तिकीट देण्यात आले आहे.