Mumbai Police News : मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 30 लाखांचा माल जप्त
Mumbai Police Seized 30 Lakh Worth Cigarette : मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पोलिसांनी कारवाई करत चक्क ज्वेलर्सच्या दुकानातून ई-सिगरेट विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातील ही मोठी कारवाई असून तब्बल 1000 नग ई सिगारेट पोलिसांनी जप्त केले आहे
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा-2 च्या Mumbai Crime Branch ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई केली. Mumbai Police Seized 30 Lakh Worth Cigarette मुंबईमधील कटलरी मार्केट, मंगलदास मार्केट मुंबई या ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी ई सिगरेट विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 30 लाख रुपयांचे ई सिगारेट असलेले 200 ते 800 नग जप्त केले आहे. चक्क ज्वेलर्सच्या दुकानातून ई-सिगरेटची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Mumbai Police Latest News
प्रतिबंधीत ई-सिगारेट मध्ये वापरण्यात येणारे निकोटीन हे शरीरास अपाय कारक असल्याने त्यावे उत्पादन, वाहतूक, साठवणुक, विक्री करण्यावर प्रतिबंध करून भारत सरकारने सन 2019 मध्ये प्रोहिबेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट ॲक्ट, 2019 हा कायदा अंमलात आणलेला आहे. प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट ॲक्ट, 2019 या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. Mumbai Police Latest News
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, 21 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा कक्ष-2 चे दोन पथक तयार करण्यात आले ज्यामध्ये एक पथक त्याचे जमाल ज्वेलर्स,( शॉप नं. 2, कटलरी मार्केट, मंगलदास मार्केट, मुंबई ) येथे व दुसरे पथक त्याचे राहते घराजवळ (फ्लॅट नं. 107, आकाश अपार्टमेंट, घास गल्ली, आग्रीपाडा, मुंबई) असे सापळा रचून थांबले असतांना फैजल जमाल मोतीवाला हा त्याचे दुकानात प्रतिबंधीत ई-सिगारेट असलेला एक कार्टून बॉक्स ज्यामध्ये 200 नग ई-सिगारेटचे विक्रीसाठी बाळगतांना मिळून आला. त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्याने प्रतिबंधीत ई-सिगारेटवा मोठ्या प्रमाणात साठा त्याचे राहते घरी आग्रिपाडा येथे करून ठेवला असलेबाबत माहिती दिली. त्यावरून त्यास ताब्यात घेवून दोन्ही पथकांनी त्याची घर झडती घेतली असता घर झडतीमध्ये प्रतिबंधीत ई-सिगारेटचे चार कार्टुन बॉक्स त्यामध्ये एकूण 800 नग प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा मिळून आला. ई-सिगारेट विक्री करीता दिल्ली आणि मुंबई येथून आणत असल्यावे सांगितले.फैजल जमाल मोतीवाला याने भारत सरकारने प्रतिबंधीत केलेला निकोटीनयुक्त ई-सिगारेट चा साठा करून विक्री व वितरणासाठी पाच कार्टून बॉक्स मध्ये ELFBAR या कंपनीचे एकूण 1000 ई-सिगारेटवे नग एकूण किंमत 30 लाख ताब्यात बाळगताना मिळून आल्याने त्याचेविरूध्द लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात कलम 07 व 08 प्रोहिबेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट ॲक्ट, 2019 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास गु.प्र.शा.गु.अ.वि., कक्ष-२, मुंबई करीत आहे. Mumbai Police Latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण, दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-2 प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, महिला पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पवार, पोलीस उप निरीक्षक संजय भावे, पोलीस हवालदार अमोल साळुंखे,प्रशांत थिटमे,स्वप्निल डेरे, पोलीस शिपाई हरड,फिरोज सय्यद, आव्हाड, सुनिल पाटील, मपोशि विमल राठोड, महिला पोलीस शिपाई सपना जाधव यांनी केलेली आहे. Mumbai Police Latest News