Thane Police News : ठाणे पोलीस आयुक्तालयात “पोलीस स्मृतिदिन” मानवंदना!
• Police Memorial Day Celebrated In Thane “पोलीस स्मृतिदिनी”214 जवानांना पोलीस आयुक्तांनी अर्पण केली श्रद्धांजली, ठाणे पोलीस दलातील चार शहीद पोलिसांनाही पोलिसांकडून मानवंदना
ठाणे :- देशभरात आज पोलीस स्मृतीदिन म्हणून पोलिसांना मानवंदना दिली जाते. 1959 दरम्यान,लडाखमध्ये भारतीय सीमेवर चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भ्याड हल्ल्यात दहा पोलीस जवान शहीद झाले होते. तेव्हापासून देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस देशात आणि प्रत्येक राज्यात पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.
ठाणे पोलिसांनी आज (21 ऑक्टोबर) स्वर्गीय निर्मल देवी चिंतामणी दिघे उद्यान, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयाजवळ पोलीस स्मृतीदिन पाळण्यात आला. या कार्यक्रमात देशभरातील 214 शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस दलातील चार शहीद जवानांनाही पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आहे. भालचंद्र दत्तात्रय कर्डिले, रमेश यशवंतराव जगताप, बाळू सुखदेव गांगुर्डे, तुकाराम यशवंत कदम या पोलिसांना ठाणे पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आहे.
पोलीस स्मृतीदिनी कार्यक्रमाकरिता भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, भुजंगराव मोहिते ( सेवानिवृत्त पोलीस आयुक्त, ठाणे), ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार, स्वातंत्र सेनानी, सामाजिक कार्य करणाऱ्या प्रतिष्ठीत व्यक्ती, जेष्ठ नागरीक, वृत्तपत्र प्रतिनिधी तसेच 4 शहिद पोलीस जवानांचे नातेवाईक उपस्थित होते.