क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune ATM Card Fraud : एटीएम कार्डची हातचलाखी आदला-बदली करून पैसे काढणाऱ्या सराईत अटकेत,4 गुन्ह्यांची उकल, वेगवेगळ्या बँकेचे 11 एटीएम केले जप्त

Shivaji Nagar Police Arrested Fraudster : एटीएम कार्ड चे अदलाबदली करून पैसे काढून नागरिकांची फसवणूक करणारा सराईत आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या तपासपथकाने अटक केली आहे. आरोपीकडून 11 वेगवेगळ्या बँकेच्या एटीएम पोलिसांनी जप्त केले आहे

पुणे :– एटीएम कार्डची हातचलाखी Pune ATM Fraud आदला बदली करत पैसे काढून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या Shivaji Nagar Police तपास पथकाने अटक केली आहे. या आरोपीकडून 4 गुन्हे उकल केली असून आरोपीकडून वेगवेगळ्या बँकेचे 11 एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच आरोपीला यापूर्वी अशाच प्रकारे दोन गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. Pune Latest Crime News

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या फिर्यादी हे बैंक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेले असता तेथील अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना ए टी एम मशिन मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ए टी एम कार्ड पिन नंबर माहिती करुन घेतल्यानंतर हात चालाखी करुन फिर्यादीकडील स्टेट बैंक ऑफ इंडिया या बँकेचे डेबिट कार्ड घेऊन त्यांना दुसरे स्टेट बैंकचे डेबिट कार्ड दिले ए टी एम मध्ये पैसे नाही असे म्हणनू फिर्यादीस आण्यास सांगितले. ए टी एम कार्ड व पिनच्या मदतीने आरोपीने फिर्यादी बैंक खात्यातून 29 हजार रुपये काढून घेतले. याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Latest Crime News

18 ऑक्टोबर रोजी पोलीस उप निरीक्षक अजित बडे व सोबत तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुन्ह्यातील संशयीत आरोपीच्या मिळत्या जुळत्या वर्णनाचा एक व्यक्ती पोलीस शिपाई प्रविण दडस यांना जे. एम. रोड येथे दिसून आला होता.त्याचे नाव पत्ता विचारले असता प्रमोद सिताराम यलमर (वय 47,रा. कुसाळकर पुतळा चौक, जनवाडी, पुणे व, मु. रा.कान्हरवाडी, मचला माळा, ता. खटाव, जि. सातारा) असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याचा अंगझडती पंचनामा केला असता 11 एटीएम कार्ड 17 हजार 50 रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला. अटक आरोपीच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी चार गुन्हे दाखल आहे तर आरोपीला यापूर्वी दोन गुन्ह्यात अशाच प्रकारे अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांकडून आरोपीने अजून कशाप्रकारे लोकांची फसवणूक केली याचा तपास केला जात आहे Pune Latest Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, Pune CP Amitesh Kumar सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिप गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते, अतुल साठे, रुपेश वाघमारे , राजकिरण पवार, पोलीस नाईक महावीर वलटे, पोशि, प्रविण दडस, पोलीस शिपाई सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक अजित बडे करत आहेत. Pune Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0