MVA Seat Sharing : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
MVA Seat Sharing : काँग्रेस आणि शिवसेना यांच्या जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता, उद्धव ठाकरे रुग्णालयातून परतल्यानंतर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांच्याकडून प्रकृतीबाबत विचारपूस
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मागील काही दिवसांपासून जागा वाटप संदर्भात तसेच मुख्यमंत्री चेहऱ्यावरून कलगीतुरा चालू होता. तसेच संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते जागेबाबत MVA Seat Sharing चर्चा करून लवकरच निर्णय घेतील आणि चर्चा करिता काँग्रेसचे वरिष्ठ नेते मातोश्रीवर येणार आहे असे सांगितले होते. तसेच काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला Ramesh Chennithala यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. Maharashtra Breaking News
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या वादामुळे नाना पटोले चर्चेसाठी असतील तर आम्ही चर्चेला जाणार नाही, अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे गटाने घेतली होती. या दोन्ही पक्षांमध्ये असलेला वाद अखेर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर पुन्हा महाविकास आघाडीतील जागा वाटपास संदर्भातील चर्चा सुरू होणार आहे. अशी माहिती चेन्नीथला यांनी माध्यमांशी बोलताना दिली. Maharashtra Breaking News