Chhatrapati Sambhajinagar ACB News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीची कारवाई ; प्रॉपर्टी डीलरला अटक
Chhatrapati Sambhajinagar Bribe News: सिडको येथे आईच्या नावावर असलेले भूखंड मुलाच्या नावावर करण्याकरिता खाजगी व्यक्तीने मागितलेले दहा हजार रुपयांची लाच, एसीबीने आठ हजार स्वीकारताना रंगेहात पकडले
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजी नगर Chhatrapati Sambhajinagar येथील सिडको येथे तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेल्या भूखंडावरील नाव हस्तांतरित करण्याकरिता खाजगी प्रॉपर्टी डीलर Property Dealing असलेल्या मुनीर गणी नाईक (60 वय,रा. हत्ती सिंग पुरा कटकट गेट छत्रपती संभाजीनगर) याला आठ हजारांची लाच 8 Thousand Bribe स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांच्या आईचे मृत्यूनंतर आईच्या नावावर असलेला सिडको हद्दीतील N2/s no 17/22, सिडको हा भूखंड स्वतःचे नावावर हस्तांतरित करण्यासाठी सिडको कार्यालयास अर्ज केला नियमानुसार त्यांनी Add.lease charges,administration fee,lease rent charges असे एकूण 1 लाख 28 हजार 242 रुपयाचा भरणा केला.तक्रारदार यांच्या नावाचे लीज डिड त्यांना निबंध कार्यालयात नोंदणी करण्यासाठी देण्यात आले आहे. लीजडीडची नोंदणी करण्यासाठी व सिडको कार्यालयाकडून एनओसी प्राप्त करून देण्यासाठी आरोपी खाजगी व्यक्तीने पंचासमक्ष दहा हजार रुपयाची लाच मागणी करून तडजोडी अंती आठ हजार रुपये स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण सापळा पथक – पोलीस हवालदार भीमराज जिवडे, रवींद्र काळे छत्रपती संभाजी नगर, यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Anti Corruption Bureau Latest News