Vidhansabha Election 2024 : पोलिसांसाठी मोठी बातमी ; विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया बंद!
•राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलालकरिता महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत
मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी राज्यातील पोलीस वर्गाकरिता मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांच्या साप्ताहिक असलेल्या रजा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले आहे.पोलिस महासंचालक कार्यालयाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करत हे आदेश दिले आहेत. रजा बंदीमधून वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणांसाठीच्या रजा वगळण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक 2024 चे राज्य पोलिस समन्वय अधिकारी डॉ. छेरिंग दोरजे यांनी संबंधित आदेश जारी केले. अनुचित घटना घडू नये म्हणून सतर्कतेचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.निवडणूक पार पडेपर्यंत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय किंवा वैद्यकीय रजा वगळून अन्य कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी घेता येणार नाही, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. त्यामुळंच हा निर्णय घेण्यात आल्याचे कळतंय.