Thane Robbery News : घरफोडी आणि वाहनचोरी करणा-या अट्टल चोरास अटक ; 4 दुचाकी हस्तगत
Thane Robbery News : नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांची धडक कारवाई सराईत गुन्हेगाराला केले गजाआड, पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या 7 गुन्ह्याचा लावला छडा
ठाणे :- नौपाडा पोलीस ठाण्याचे Nawpada Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांनी सिंघम स्टाईल कारवाई करत घरफोडी आणि वाहन चोरी प्रकरणात एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.आरोपींकडून वाहने चोरीतील 4 दुचाकी जप्त करण्यात आले आहे. नौपाडा सह नवी मुंबईच्या Navi Mumbai Police Station विविध पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या विरोधातील सात गुन्ह्यांच्या छडा लावला आहे. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता नौपाडा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे आणि त्यांच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विलास देसाई यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती नौपाडा हद्दीत वाहन चोरीच्या उद्देशाने फिरत आहे. बामतीच्या अनुषंगाने सापळा रचून नन्नू रमेश पठाडे (26 वय रा. कोपरखैरणे, नवी मुंबई ) यास शिताफीने ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे खिशामध्ये 5 ते 6 विवीध दुचाकीच्या चाव्या मिळून आल्या. त्या ठिकाणी वाहन चोरीच्या उद्देशाने आल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने नौपाडा परिसरात घरफोडी व वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून, तपासा दरम्यान त्याचेकडून 2 बजाज 220 पल्सर, एक पेंशन प्रो, एक बजाज प्लॅटीना अशा एकुण 4 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात 3 गुन्हे, तर नौपाडा पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल असून त्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई नौपाडा पोलीस ठाण्यात केली जात आहे. Thane Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक सुनिल तांबे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक मकानदार, पोलीस हवालदार राजेंद्र गायकवाड, साहेबराव पाटील, विलास देसाई, सचिन रांजणे, ईश्वर गोलवड, पोहवा मेहरबान तडवी, पोलीस नाईक समाधान माळी, पोलीस शिपाई सारंग कांगणे, गंगाधर तिर्थकर, यांनी केलेली आहे. Thane Latest Crime News