Cyber Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फसवणूक ; सायबर पोलिसांची दमदार कामगिरी फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास यश
Nalasopara Cyber Crime Branch Arrested Fraudster : शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे आमिष तक्रारदाराला भोवलं ; सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी फसवणुकीतील संपूर्ण रक्कम मिळवून देण्यास यश
नालासोपारा :- सायबर भामट्यांनी चोरीचा आता नवीन धंदा चालू केला आहे. यामध्ये खास करून शेअर ट्रेडिंग च्या नावाने फ्रॉड ची संख्या वाढतच आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होणाऱ्यांनी जर त्वरित सायबर पोलिसांना तक्रार केली तर तुमचे फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलीस नक्कीच यशस्वी कामगिर करत आहे. अशीच एक घटना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या बुरमान यांच्यासोबत झाली आहे. सायबर फसवणुकीमध्ये बुरमान यांचे 4 लाख 16 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती. परंतु बुरमान यांनी सायबर पोलिसांना या संदर्भात तक्रार करून सायबर पोलिसांनीही यशस्वी कामगिरी करत फसवणुकीतील संपूर्ण रक्कम मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार आहे बुरमान यांना मोबाईलवर एक लिंक प्राप्त झाली होती. लिंक वर क्लिक केले असता त्या मध्ये कोटक महिंद्रा बँक चे लोक असलेले ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले त्या द्वारे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळेल या आमिषाला बळी पडत बुरमान यांनी त्या लिंक मध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या रक्कमेपैकी कोणत्याही प्रकारे परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात बुरमान यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal वर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेले आर्थिक व्यवहाराची तपासणी करून सर्व रक्कम पोलिसांना गोठाविण्यात आली. पोलिसांनी बँकेची आणि न्यायालयाची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम बुरमान यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांना फसवणुकीतील 4 लाख 16 हजार रुपयांची रक्कम बुरमान यांच्या खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाल राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.