महाराष्ट्र

Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपालांनी 7 नावे सुचवली, या जागा भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला

विधानपरिषदेसाठी सात आमदारांच्या नावांना राज्यपालांनी मंजुरी दिली. स्वीकृत नावांमध्ये भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य आहेत.

मुंबई :- विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडून नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या 12 पैकी सात आमदारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून 12 राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांचा निर्णय प्रलंबित होता. आता सात आमदारांची नावे निश्चित झाली आहेत, ती पुढीलप्रमाणे.

भाजपकडून 3 नावे
1.चित्रा वाघ
2.विक्रांत पाटील
3.धर्मगुरू महाराज राठोड.

शिवसेनेकडून (शिंदे गट)2 नावे
1.मनीषा कायंदे
2.हेमंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार)2 नावे

1.पंकज भुजबळ
2.इद्रिस नायकवडी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यांना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारने आधीची 12 नावांची यादी मागे घेतली आणि आता नव्याने सात नावांची शिफारस करण्यात आली आहे. आधीच्या सरकारची नावे मागे घेण्याच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून याचिका प्रलंबित आहे. अडीच वर्षात न झालेल्या नियुक्त्या महिनाभरात होणार नाहीत, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली होती व नियुक्त्यांना स्थगिती दिली नव्हती. महाधिवक्त्यांनीही याबाबत न्यायालयात निवेदन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0