मुंबई

Prakash Ambedkar Letter : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून केली ही मागणी

•धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना टोल माफ करावे अशी मागणी पत्रातून प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे

मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी दिनी म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दीक्षा घेतली होती. तसेच, दसऱ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बौद्ध अनुयायी धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी दर्शनासाठी येत असतात यानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी नागपूर मध्ये दाखल होतात याकरिताच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दीक्षाभूमी येथे येणाऱ्या वाहनां करिता टोल माफी करावी अशी मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचे पत्र..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौध्द धम्माची दिक्षा घेतली हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा मुक्तीचा दिवस आहे. दर वर्षी प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा सन साजरा करण्यात येतो, यावर्षी 12 ते 13 ऑक्टोंबर 2024 दरम्यान दिक्षा भूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी हा सन साजरी करण्यासाठी प्रवास करत असतात. एवढ्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सन असताना त्यांच्याकडून टोल वसूल केला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. मी वंचित बहुजन आघाडी कडून मागणी करतो की, आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द अनुयायांसाठी आकारण्यात येणारा टोल माफ करावा कृपया आपण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0