Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जळगावच्या सभेमध्ये परिवारवादाच्या मुद्द्यावरून शरद पवार सह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Amit Shah Target Sharad Pawar From Jalgaon : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला विरोधी पक्ष नेते विधानपरिषद अंबादास दानवे यांच्याकडून प्रत्युत्तर
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah लोकसभेच्या निवडणुकीच्या Lok Sabha Election पूर्वी राज्यातील परिस्थिती पाहण्याकरिता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. जळगावच्या सभेत त्यांनी परिवार वादावर भाष्य करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसेच सोनिया गांधी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षात सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचंय शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं अशी टीका अमित शहा यांनी केली होती. या टिकेवर राज्याचे विरोधी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
अंबादास दानवे यांनी ट्विट करत टीका केली आहे
केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांनी काल परिवारवादावर बरीच धूळफेक केली. हे बोलताना ते मात्र स्वतः उभे असलेल्या व्यासपीठावर पाहायला विसरले. व्यासपीठावरील घराणेशाहीचे उदाहरण असलेली ही काही नावे..
१. शोभा फडणवीस – देवेंद्र फडणवीस
२. गोपीनाथ मुंडे – पंकजा मुंडे
३. शंकरराव चव्हाण – अशोक चव्हाण
४. रावसाहेब दानवे – संतोष दानवे
यांच्याकडे डोळेझाक, कारण ते तुमच्यासोबत! शिवाय असले काही पक्षही तुमच्यासोबत आहेत ज्यांचा पायाच एक घराणे आहे..
१. शिरोमणी अकाली दल (पंजाब)
२. पासवान परिवार (बिहार)
३. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (महाराष्ट्र)
४. नॅशनल पीपल्स पार्टी (मेघालय)
५. जनता दल सेक्युलर (कर्नाटक)
६. राष्ट्रीय लोक दल (उप्र, राजस्थान)
अजून बरेच आहेत! या गोष्टी आम्हाला कशाला सांगता.. महाराष्ट्रात ठाकरे घराण्यावर लोकांनी प्रेम केले आहे. जोपर्यंत ठाकरे तुमच्यासोबत तोपर्यंत ते चांगले, आणि विरोधात गेले की घराणेशाहीचा पुरस्कर्ते? ही डबल ढोलकी वाजवणे लोकांना दिसते. हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही..ध्यानी असू द्या..वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच आहे! अशी टीका अब अंबादास दानवे यांनी केली आहे.