agricultural assistant trapped by ‘ACB’ : फळबाग योजनेतून मस्टर बिल काढण्यासाठी कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडे मागितली पाच हजार रुपयांची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांची कारवाई लाचखोर कृषी सहाय्यक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर :- तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड Taluka Agriculture Officer, Sillod Bribe यांच्या कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी याने शेतकऱ्याकडे फळबागा योजनेतील मस्टर बिल काढण्याकरिता पाच हजारांची लाच मागितली. लाचखोर सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर एसीबीने धाड टाकली आहे. agricultural assistant trapped by ‘ACB श्रीकांत मधुकर डुकरे (37 वय) कृषी सहाय्यक अधिकारी असे ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव आहे. Anti Corruption Bureau Latest News
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांचे चिंचपूर शिवार हद्दीत,तालुका सिल्लोड, शेत गट नंबर 150 मध्ये लावलेल्या फळबागाचे महाराष्ट्र शासनाच्या M.R.E.G.S. (मग्रारोहयो) ,फळबाग योजनेमधून फळबाग योजनेतील मस्टर बिल काढण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी डुकरे यांनी पंचासमक्ष पाच हजारांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती चार हजार स्वीकारण्याचे मान्य करून, आज (8 ऑक्टोबर ) रोजी पंचासमक्ष चार हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः कविता झेरॉक्स, सिल्लोड शहर येथे स्वीकारली. डुकरे यांना लाच रक्कामेसह ताब्यात घेण्यात आले असून सिल्लोड (शहर) पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर.मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,सुरेश नाईकनवरे, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,सापळा पथक पोलीस हवालदार अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर, देवसिंग ठाकुर, लाप्रवि. छत्रपती संभाजी नगर,आलोसे यांचे सक्षम अधिकारी- विभागीय कृषी सह संचालक छत्रपती संभाजी नगर येथे धाड टाकत सहाय्यक कृषी अधिकारी याला ताब्यात घेण्यात आले आहेत. Anti Corruption Bureau Latest News