मुंबई
Trending

Babanrao Madne : “र” चा “ड” झाल्याने धनगर समाजाला 68 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित

•अजित पवार गटाचे नेते Babanrao Madne यांनी शेळ्या मेंढ्यांना घेऊन मुंबई ठप्प करण्याचा दिला इशारा!

मुंबई :- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दा कळीचा मुद्दा बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि धनगर समाजाचे अभ्यासक बबनराव मदने यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे असे बोलले जाते “ध”‌ चा “म” झाला की विषय बदलतो. त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत “र” चा “ड” झाल्याने धनगर समाजाला गेली 68 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित राहिला लागले आहे. आरक्षणाचा मुद्दा घेत बबनराव मदने यांनी सरकारने जर आरक्षणाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई चक्काजाम करेल असा इशारा मदने यांनी दिला आहे.

अजित पवार गटाचे बबनराव मदने यांना धनगर समाजाचा अभ्यासक म्हणून पाहिले जाते. धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मागील तीस वर्षाहून अधिक कालावधी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भूमिका मांडण्यात आले आहे. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी आणि राज्यपाल नियुक्ती विधान परिषदेचे आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधींना संधी मिळावी असा प्रमुख मागण्याकरिता ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धनगर आरक्षणाबाबत पाठपुरावा करत आहे. 1956 च्या एसटी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमे 36 वर धनगर अशी नोंद आहे मात्र देवनागरी लिपीत इंग्रजी मधून धनगर चे स्पेलिंग धनगर ऐवजी धनगड असे लिहिले आहे. या शब्दाचा अर्थ घेऊन गेल्या 68 वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे धनगर समाजाला मोठ्या प्रमाणावर अन्याय सहन करावा लागला आहे. घटनेत आरक्षण दिले असतानाही किंवा शाब्दिक चुकांमुळे धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले असल्याचे आरोप बबनराव मदने यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या धनगर समाजाचा एक बुलंद आवाज म्हणून बबनराव मदने यांच्याकडे पाहिले जाते. तसेच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीत धनगर प्रवर्गातून किंवा खुल्या प्रभागातून अजित पवार गटाकडून एक सच्चा कार्यकर्ता म्हणून बबनराव मदने यांना संधी मिळावी असा आवाज धनगर समाजांनी यापूर्वीच उठवला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत शासनाकडून काही निर्णय घेण्यात आला तर निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल असे बबनराव मदनेही म्हणाले. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांमध्ये धनगर समाजाचा प्रतिनिधी म्हणून अजित पवार गटानी बबनराव मदने यांना संधी द्यावी याकरिता धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणात अजित पवारांकडे मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0