मुंबई
Trending

Shivsena :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बसला धक्का! दिपेश म्हात्रे यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत

Shivsena UBT : विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सात माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी VIdhan Sabha Election मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली आहे. रविवारी शिंदे गटाचे युवासेना सचिव दिपेश Dipesh Mahtre यांच्यासह सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर आयोजित कार्यक्रमाला या नेत्यांनी हजेरी लावली. मंत्री रवींद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यात वाद झाला होता. यामुळे दिपेश म्हात्रे संतप्त झाले. Maharashtra Latest Political Update

डोंबिवलीत ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे प्रदेश चिटणीस दिपेश म्हात्रे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांनी मशाल धरली. Maharashtra Latest Political Update

दिपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपाताई शेलार यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. थोडा आधी निर्णय झाला असता तर या गुंडगिरी आणि अत्याचाराला लोकसभेतच गाडले गेले असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. Maharashtra Latest Political Update

कल्याण-डोंबिवली हा शिवसेना, हिंदुत्व आणि शिवरायांचा बालेकिल्ला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. इथे भगव्याला विश्वासघाताचा डाग आहे, तो डाग धुवा आणि भगवा मशाल म्हणून जाळून टाका. कल्याण-डोंबिवली पुन्हा शिवसेना करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. Maharashtra Latest Political Update

कोण आहे दिपेश म्हात्रे?

दीपेश म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष होते. पक्ष फुटी नंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झाले. शिंदे गटांमध्ये त्यांना मोठी जबाबदारी देत युवासेना सचिव पदाची जबाबदारी दिली होती. श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून दीपेश म्हात्रे यांना ओळखले जाते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दीपेश म्हात्रे यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. दीपेश म्हात्रे मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाचे आणि डोंबिवलीचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत खटके उडत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये डोंबिवली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभेतून इच्छुक उमेदवार असल्याचे म्हटले जाते. Maharashtra Latest Political Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0