Mumbai Hit & Run Case : मुंबईत खासदारच्या मुलाच्या गाडीची धडक, गंभीर जखमी, आरोपीला अटक
•MP Chandrakant Handore son Ganesh Handore car Accident खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी आरोपींविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई :- मुंबईतील गोवंडी परिसरात खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश यांच्या गाडीने एका व्यक्तीला धडक दिली. या घटनेत गोपाल आरोटे नावाच्या व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पोलघसांनी खासदाराचा मुलगा गणेश याला अटक केली आहे.त्यांची साखरेची पातळी 550 असल्याने त्यांना इतर आजार असल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कलम 110, 125 (अ), (ब), 281, बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अ), (ब), 184 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आरोपी गणेश हंडोरे हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेला जात होता. तेथून परत येताना चेंबूर येथील आचार्य कॉलेजलगत त्याने गोपाळ आरोटे नामक एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर गणेश हंडोरे तिथे थांबला नाही. त्याने तशीच आपली कार पुढे दामटली. काही प्रत्यक्षदर्शीनी त्याचा पाठलाग केला. पण तो हाती लागला नाही.