छत्रपती संभाजी नगर

Chhatrapati Sambhajinagar Crime News : प्रमोशन साठी लाच मागणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला एसीबीच्या बेड्या

•ACB Action Mode On In Chhatrapati Sambhaji Nagar लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांची कारवाई अंगणवाडी मदतनीस यांची नियमाप्रमाणे अंगणवाडी सेविका पदावर प्रमोशन झाले होते. प्रमोशन तात्काळ करण्यासाठी बालविकास अधिकाऱ्याने मागितली 25 हजारांची लाच

छत्रपती संभाजीनगर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्या युनिटने कारवाई करत बालविकास प्रकल्प अधिकारी आणि शिपाई यांच्यावर कारवाई करत एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. अंगणवाडी मदतनीस यांच्या अंगणवाडी सेविका म्हणून प्रमोशन झाले होते आणि ते प्रमोशन तात्काळ करण्याकरिता 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अनिल सुनील चव्हाण (29 वय) बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय पंचायत समिती वैजापूर. अनंत सूर्याभान बुट्टे (45 वय) शिपाई महिला व बालविकास विभाग पंचायत समिती वैजापूर असे एसीबीच्या छापेमारीमध्ये लाच स्वीकारणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर यांची दमदार कामगिरी

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांच्या पत्नी या मौजे शहाजतपूर येथे सन 2015 पासून अंगणवाडी मदतनीस आहेत. 17.03.23 रोजी अंगणवाडी सेविका या पदावर प्रमोशन देण्यात आले होते.परंतु उच्च न्यायालय यांनी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकापदाच्या प्रमोशन वरती स्थगिती दिल्यामुळे तक्रारदार यांच्या पत्नीचे अंगणवाडी सेविका या पदावरती प्रमोशन झाले नव्हते. त्यानंतर 3 सप्टेंबरला अंगणवाडी सेविका या पदोन्नतीचा स्टे न्यायालय कडून उठवण्यात आल्याने व नियमितपणे अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार व त्यांच्या पत्नी या 30 सप्टेंबर रोजी अंगणवाडी सेविका प्रमोशन बाबत चर्चा करण्यासाठी पंचायत समिती वैजापूर येथील अनिल चव्हाण, (बाल विकास प्रकल्प अधिकारी,) एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय वैजापूर यांना कार्यालयात भेटले. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्या पत्नीला अंगणवाडी सेविका या पदावरती पदोन्नती देण्यासाठी 50 हजारांची मागणी केली, जर तुम्ही पैसे नाही दिले तर तुमचे अंगणवाडी सेविका या पदावर वेळेवरती प्रमोशन देणार नाही असे सांगितले. त्यावेळी शिपाई अनंत बुट्टे तक्रारदार यांना साहेब म्हणता ते पैसे देऊन टाका बाकी काय असेल ते मी मॅनेज करतो असे म्हणाले.त्यानंतर तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो जालना येथे लोकसेवक यांच्या विरुद्ध लाच मागणीबाबत तक्रार दिल्याने 01.10.2024 रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार हे पंचा समक्ष अनंता बुट्टे यांना भेटले. शिपाई अनंता यांनी अनिल चव्हाण मीटिंगसाठी बाहेरगावी असल्याने तक्रारदार यांना 3 ऑक्टोबर रोजी येण्यास सांगितले.

लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार हे अनंता यांना भेटले असता त्यांनी अनिल चव्हाण हे परगावी मीटिंग साठी गेले असल्याने दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. त्यानंतर आज ( 04 ऑक्टोबर) रोजी तक्रारदार हे अधिकारी चव्हाण यांना त्यांच्या कार्यालयात साक्षीदार विशाल साळुंखे व ज्ञानेश्वर मुलमुले यांच्यासोबत भेटले. त्यावेळी चव्हाण यांनी तक्रारदार यांना 25 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती त्यांच्याकडून 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच तक्रारदार यांच्यासोबत असलेले साक्षीदार विशाल काळुंखे व ज्ञानेश्वर मुलमुले यांना प्रत्येकी दहा हजार रुपये लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार व साक्षीदार हे लाचेची रक्कम घेऊन आल्यानंतर सदर लाचेची रक्कम शिपाई यांनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून स्वीकारून लाचेची रक्कम अधिकारी चव्हाण यांच्या केबिन मधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली असता लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले. वैजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर ,बाळू जाधवर,पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी शंकर म.मुटेकर
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना.सापळा पथक गजानन खरात, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे ,गजानन कांबळे, अतिश तिडके, भालचंद्र बिनोरकर यांनी कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0