क्राईम न्यूज
Trending

Market yard Pune Murder |मार्केटयार्ड परिसरात निर्घृण खून : बिबवेवाडी तपास पथकाकडून तिघांना बेड्या

  • समाजातील वितुष्ट जीवावर बेतले | Market yard Pune Murder

पुणे, दि. ३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी

Market yard Pune Murder समाजहितासाठी काम करताना वितुष्ट निर्माण होऊन मार्केट यार्ड परिसरात एकावर प्राणघातक हल्ला झाला. हल्लयात गंभीर जखमी युवकाचा रुग्णालयात मुर्त्यू झाला. यावेळी हल्ला करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना बिबवेवाडी तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर पाठोपाठ सुरु झालेले हत्या सत्र पुण्यात वाढतच आहे. पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

या हल्लयात बाळासाहेब रणदिवे याचा मृत्यू झाला आहे. Balasaheb Randive murder

फिर्यादी व त्यांचा मित्र बाळासाहेब रणदिवे दिनांक ०२ रोजी रात्री ९ वा.चे सुमारास सावित्री हॉटेलचे समोरचे शेड मध्ये येवले चहाच्या समोर चहा पित असतांना संशयित राहुल खुडे, सचिन खुडे, सुरजसिंग दुधानी व हनुमंत कांबळे तेथे येवुन (मयत) बाळासाहेब रणदिवे याने व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमुळे चिडून जाऊन हातातील स्टीलचे हत्याराने दहशत निर्माण करुन बाळासाहेब रणदिवे यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले आहे.

याबाबत मार्केटयार्ड पो स्टे Market Yard Police Station १६१/२०२४, भा. न्या. सं.१०९,३ (५), ३५१ (३) शस्त्र अधिनियम ४ (२५), ३७ (१) (३) सह १३५ कलम वाढ भा.न्या. सं कलम १०३ सह क्रिमिनल लॉ अॅमेंडमेन्ट क.9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पो.निरी. (गुन्हे) राहुल खिलारे Police Inspector Rahul Khilare करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0