Thane Navratri Ustav 2024 : “अरे हालो रे हालो….”ठाणेकर नवरात्रात गरब्यावर पोलिसांच्या सुरक्षेत फिरकणार
Thane Police Navratri Ustav Security : नवरात्र उत्सवाच्या दरम्यान ठाण्यात पोलिसांचा काटेकोरपणे बंदोबस्त, ठाण्यात 572 ठिकाणी सार्वजनिक आणि 503 ठिकाणी खाजगी गरबा, पोलिसांचा मोठा फौजफाटा नवरात्रात तैनात
ठाणे :- पोलीस आयुक्तालयाकडून Thane CP जारी करण्यात आली आहे की, ठाण्यात यंदा 572 ठिकाणी सार्वजनिक तर 503 ठिकाणी खाजगी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र Navratri Ustav 2024 Thane बोलले की, जल्लोषात मोठ्या उत्साहात आपल्या देवीचे भक्तीभावाने पूजा,देवीमातेकरिता आपण गरबा खेळतो देवीला सांगड घालतो. या भक्तीमय आणि प्रसंग वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीसांच्या सुरक्षेत ठाणेकर गरब्यामध्ये फिरणार आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे,
घटस्थापनेपासून ते दसरापर्यंत हिंदू धर्मियांचा नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. त्यात 609 सार्वजनिक व 3278 खाजगी दुर्गादेवी मुर्तीची स्थापना होणार आहे. तसेच एकुण 141 सार्वजनिक व 260 खाजगी देवीचे फोटो आणि प्रतिमांची स्थापना होणार आहे. कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण 572 ठिकाणी सार्वजनिक आणि 503 ठिकाणी खाजगी गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याव्यतिरीक्त सांस्कृतिक कार्याक्रम, भजन, आर.एस.एस. पथसंचलन, दुर्गा दौड, यात्रा, रावण दहन इत्यादी कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान नागरिकांमध्ये अतिशय उत्साहाचे व धार्मिक वातावरण असते. त्यामुळे उत्सवादरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन शांतताभंग होणार नाही या दृष्ट्रीकोनातुन जास्तीत जास्त पोलीस मनुष्यबळ तसेच साधनसामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सवात जास्तीत जास्त महिला आणि मुली या रास गरबा दांडिया खेळण्यासाठी जमा होत असतात त्यावेळी त्यांची छेडछाड, विनयभंग, चैन,मोबाईल,पर्स,बॅग स्नॅचिंग होवु नये, कार्यक्रमासाठी येणा-या भाविकांचे मोटारवाहनांची चोरी होवु नये. तसेच धार्मिक भावना दुखावुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या दृष्ट्रीकोनातुन साध्या वेशातील जास्तीत जास्त पुरुष/महिला पोलीस अंमलदारांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
कालावधीत धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेजेस आणि पोस्ट, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकुन काही समाजकंटक समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा समाजकंटकावर लक्ष ठेवुन त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सोशल मिडीया सेल देखील सर्तक करण्यात आले आहे. तसेच असे काही मॅसेजेस, पोस्ट, व्हिडीओ बाबत माहिती मिळाल्यास त्वरीत नजिकच्या पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याबाबत पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडुन जनतेला अवाहन देखील करण्यात आले आहे. सदर नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त 04, पोलीस उप आयुक्त-09 सहाय्यक पोलीस आयुक्त-15, पोलिस निरीक्षक-91, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक 283, महिला पोलीस अधिकारी 29, पुरुष अंमलदार – 2552, महिला अंमलदार 547, एसआरपीएफ कंपनी-03 क्युआरटी प्लॅटुन-03 असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडुन सर्व नागरिकांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.