Uncategorized
Trending

Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो सांगत लाखोंची फसवणूक, सायबर पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी

Uttan Safari Police Arrested share Market Fraudster : शेअर मार्केटच्या फसवणुकीतील गमावलेले पैसे परत मिळवून देण्यास उत्तन सागरी पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी, फसवणुकीतील दहा लाख तक्रारदाराच्या खात्यावर जमा!

मिरा रोड :- शेअर बाजारात गुंतवणूक Share Market Investment करुन अधिक परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून महिलेची लाखोंची रुपयांची फसवणूक Mira Road Share Market Fraud करण्यात आलीय. या महिलेची तब्बल 13 लाख 83 हजार रुपयाचे ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली होती. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग Share Market Trading करून मोठ्या प्रमाणावर फायदा आणि मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. परंतु उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाने Uttan Sagari Police Station महिलेच्या फसवणुकीतील दहा लाख रुपये परत मिळवून देण्यास यश आले आहे. Mira Road Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या जास्मिन मोहम्मद हुसेन पिराणी (42 वय, रा. डेल्टा गार्डन एमआयडीसी रोड मिरा रोड) या परिसरात राहणारे असून यांना instagram वरील ट्रेडिंग संबंधित असलेले लिंक द्वारे पाच पैसा या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड केले. त्यानंतर त्या महिलेला फाईव्ह पैसा या अँप वरून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास तर जास्त परतावा मिळेल असे प्रलोभन दाखवून महिलेला वेळोवेळी आरोपींनी वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावरून ट्रेडिंग करिता जवळपास 13 लाख 83 हजार रुपये भरायला पार पडले. महिलेने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यानंतर उत्तन सागरी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 (सी),66(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात पोलिसांच्या माहितीनुसार एकापेक्षा अधिक पीडित आहेत. या सायबर भामट्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. Mira Road Latest Crime News

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादी आणि पीडित यांची आरोपींनी रक्कम स्वीकारण्यासाठी तसेच रक्कम वेगवेगळ्या बँक अकाउंट वर वळती करण्यासाठी वापरले गेलेले अनेक बँक अकाउंट निष्पन्न झाले. त्यामुळे तक्रारदाराचे पैसे परत मिळवण्याकरिता बँक अकाउंट मधील रक्कम गोठविण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तक्रारदार महिलेचे फसवणुकीतील एकूण रक्कमेपैकी दहा लाख रक्कम त्यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरावरून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. Mira Road Latest Crime News

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 01 मिरारोड, दीपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषिकेश पवळ, पोलीस हवालदार राजाराम आसवले, दिलीप सनेर यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0