क्राईम न्यूजमुंबई
Trending

Auto Rickshaw Robbery Case : ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Naygaon Police Arrested Auto Rickshaw Criminal : नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची धडक कारवाई ; सराईत ऑटो रिक्षा चोरी करणारे आरोपीला जेरबंद, 2 गुन्हे उघडकीस

वसई :- ऑटो रिक्षा चोरी Auto Rickshaw Robbery करणाऱ्या सराईत चोरट्याला नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने नायगाव येथुन अटक केली आहे. ब्रिजेश रामकिशन राजभर,(18 वय, रा.दत्ताआली रोड, हसोबा मंदीर, नायगाव पूर्व) असे या चोरटयाचे नाव असून त्याने नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरलेल्या दोन ऑटो रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. Vasai Crime News

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑटो रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पौणिमा चौगुले पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांना दिले होते. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रिक्षा चोरी प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता. या तपासात गुन्हे शाखेने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एक संशयीत व्यक्ती रिक्षा चोरी करताना निदर्शनास आला.व्यक्तीची गुन्हे शाखेने माहिती काढली असता, तो रेकॉर्डवरील आरोपी ब्रिजेश रामकिशन राजभर असल्याचे आढळुन आले. तसेच सध्या तो नायगाव येथे रहाण्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांना सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 सप्टेंबर च्या पहाटे फिर्यादी याचे चुलत भाऊ बिफिनसिंग यांनी घराबाहेर उभे केलेली ऑटो रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार नायगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीकडून दोन रिक्षा हस्तगत केल्या आहेत. तसेच त्याच्यावरील इतर दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. Vasai Crime News

पोलीस पथक
मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ वसई, नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, गणेश केकान, पोलीस अंमलदार सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पाडुरंग महाले यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0