मुंबई

Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर!

Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर! भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा करिता कंबर कसली‌ ; मुंबई,नवी मुंबई, ठाणे,कोकणातील आमदारांसोबत तसेच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

मुंबई :- लोकसभेला भाजपला चांगला फटका बसल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वेच भाजपाने महाराष्ट्रात जोरदार फिल्डिंग लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा आज आणि उद्या अशा दोन दिवसा करिता मुंबई दौऱ्यावर येणार असून ते मुंबई, ठाणे, कोकण, नवी मुंबई येथील आमदारांशी आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहे. तसेच या दौऱ्या दरम्यान अमित शहा यांच्याकडून मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आला आहे. महायुतीचा फॉर्मुला फायनल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई Amit Shah Mumbai Visit आणि नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. अमित शाह यांचे मुंबईत स्वागत अशा आशयाचे बॅनर सध्या मुंबईत झळकताना दिसत आहेत. Maharashtra Vidhansabha Election 2024 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कशाप्रकारे असणार आहे दौरा?

अमित शाह यांनी आज दुपारी 1.30 वाजता मुंबईतील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. दादर येथील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अमित शाह हे मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील बैठकीनंतर अमित शाह हे संध्याकाळी 4.30 च्या सुमारास नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये बैठक घेणार आहेत. यावेळी ते ठाणे व कोकण विभागातील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील.

या दोन्हीही बैठकींनंतर आज रोजी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला स्वत: अमित शाह उपस्थितीत असणार आहे. यावेळी अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी अमित शाह हे मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0