- गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ कडून कारवाई
पुणे, दि. २८ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर :
मुबारक जिनेरी
Pune Opium Seized | पुणे शहरातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेने धडक मोहीम उघडली आहे. आज दि. २८ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ वपोनि सुदर्शन गायकवाड यांनी एका कारवाईत भारती विद्यापीठ हद्दीतील आंबेगाव येथून एका ड्रग्स तस्कराला ताब्यात घेत तब्बल ५७ लाखांचा अफिम जप्त केला आहे.
संशयित आरोपी देविलाल शंकरलाल आहीर, रा. कात्रज, पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Opium Seized
आज दि.२८/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त अधिकारी व अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार आंबेगाव, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे देविलाल शंकरलाल आहीर, रा. कात्रज, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण ५६,९०,०००/- रु. कि.चा २ किलो ८४५ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ तसेच माल लपविण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे