क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Robbery News : बुरखाच्या आड दडला चोर…! राधा हॉस्पिटल मध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला उत्तरप्रदेश मधून अटक

Mira Road Robbery News : डॉ.कपिल प्रमोदकुमार शुक्ला यांच्या विनय नगर येथील राधा हॉस्पिटल मध्ये लाखोंची चोरी, तपासात धक्कादायक प्रकाराला समोर

मिरा रोड :- चोरट्यांनी चक्क बुरखा परिधान करून लाखो रुपयांची रोकड डॉ. कपिल प्रमोदकुमार शुक्ला यांच्या रुग्णालयातून Dr. From Kapil Pramod Kumar Shukla’s hospital लंपास केली आहे. डॉक्टरांच्या तक्रारीवरून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.याच्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्या साथीदाराला पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली आहे. Mira Road Robbery News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर च्या मध्यरात्री डॉक्टर कपिल प्रमोद कुमार शुक्ला (34 वर्ष रा. गोकुलधाम सोसायटीच्या बाजूला गोरेगाव) यांनी तक्रार दिली होती की विनय नगर येथे असलेल्या राजा हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे पेशंटला तपासण्याकरिता गेले असता त्यांच्या केबिनमध्ये टेबलवरचे ड्रॉवर व लाकडी कपाट तोडून त्यामधील ठेवलेले 21 लाख रुपयांची लंपास झाले होते. त्या संदर्भात काशिगाव पोलीस ठाण्यात Kashigaon Police Station आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(4),305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Robbery News

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून दाखल गुन्हा उघड करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे काशिगांव पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाचे बारकाचे तपासुन गुन्हा हा हॉस्पीटलची माहीती असलेल्या व्यक्तीने केला असल्याचा सुगावा मिळाला होता.त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास केला असता हॉस्पीलटमध्ये पुर्वी काम करत असलेला मनिषकुमार जयश्याम मिश्रा यांस प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश येथुन ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणुन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत व मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या कौशल्यातुन त्यांच्याकडे चालक म्हणून काम करणारा त्यांचा चालक सोनु अल्लाउद्दन शेख याने गुन्हा केला असल्याचे दिसून आले होते. सोनु अल्लाउद्दन शेख यांस बिहार येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे केलेल्या तपासात गुन्हा त्यांनी फौजदारीपात्र कट करुण केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. Mira Road Robbery News

24 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून अटक आरोपींकडुन गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या हॉस्पीटलमधून चोरी केलेल्या रक्कमे पैकी एकुण 18 लाख रुपये रोख रक्कम तसेच‌ गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा, आरोपीने परिधान केलेला बुरका व घरफोडीचे साहित्य इत्यादी त्यांच्याकडुन हस्तगत करण्यात आले आहे. अटक आरोपी हे दिनांक 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक अभिजीत लांडे, किरण बगडाणे हे करत आहे. Mira Road Robbery News

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग, राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0