क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

ACB Trap News : एसीबी कारवाई ; वनरक्षक आणि वनपाल यांच्यावर एसीबीची झडप

Forest Guards and Forest Officer Arrested By Anti Corruption Bureau For 40 Thousand Bribe in Palghar : चाळीस हजारांची लाच घेताना वनपाल आणि वनरक्षक जाळ्यात; गुन्हा दाखल करून कारवाई करू नये याकरिता मागितली होती 1 लाख 30 हजार रुपयांची लाच

पालघर :- वनपाल आणि वनरक्षक Forest Guards and Forest Officer यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर Anti Corruption Department Palghar यांनी कारवाई करत लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. एसीबीने सापळा Palghar ACB Trap रचून वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर झडप घातली आहे. 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने दोघांना अटक करण्यात आली आहे. पन्नालाल दिनकर बेलदार (35 वर्ष) वनरक्षक, शुगर शांताराम सनेर (45 वर्ष) वनपाल हे दोघे परिमंडळ अधिकारी कार्यालय सातिवली रेजनाका गोखिवरे येथे आहे. दोघांनी तक्रारदाऱ्याच्याकडे एक लाख तीस हजार रुपयांची लाच मागितली होती. Anti Corruption Bureau Latest News

तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई-अहमदाबाद हायवेला लगतच चाळ आहे. चाळीतील खोल्यांना हायवेच्या विरुध्द बाजूने दरवाजे आहेत. तक्रारदार यांनी चाळीतील खोल्यांना येण्या-जाण्याच्या सोईकरीता हायवेच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरु केले होते. यातील पंकज सनेर यांनी तक्रारदार यांना 16 सप्टेंबर 2024 रोजी कार्यालयान बोलावुन हायवेकडील बाजू ही वन विभागाची हदद् असल्याचे सांगुन त्या बाजुस दरवाजे काढायचे काम केले असल्याने तक्रारदार यांचेविरुध्द वन कायदयानुसार तात्काळ कारवाई करण्याची धमकी दिली. तक्रारदार याने कारवाई न करण्याची विनंती केली असता पन्नालाल आणि पंकज या वनरक्षक कर्मचाऱ्यांनी यांनी तक्रारदार यांचेकडे लागलीय प्रत्येक खोलोमागे 80 हजार रुपये अशी 3 खोल्यांकरीता लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी कारवाई टाळल्यासाठी नाईलाजास्तव मागणी केलेल्या रकमेपैकी रुपये 90 हजार असे लाचेची रक्कम दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी देवुन उर्वरित रक्कमेकरीता वन कर्मचारी यांनी पाठपुरावा केला असता तक्रारदार यांनी 25 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत घेतली. उर्वरित रक्कमेकरीता वन कर्मचारी यांनी पाठपुरावा केला असता तक्रारदार यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी ला.प्र.वि. पालघर येथे तक्रार केली. Anti Corruption Bureau Latest News

तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आलोसे यांनी यापुर्वी 90 हजार रूपये स्विकारल्याचे कबूल करून उर्वरित रक्कम तडजोडीअंती एक लाख तीस हजार रूपये रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाले व लागलीच करण्यात आलेल्या सापळा पंचनाम्या दरम्यान पन्नालाल बेलदार यांना रूपये 40 हजार रक्कम स्विकारताना जागेवरच रंगेहाथ पकडण्यात आले असून पंकज सनेर यांनाही गुन्हयामध्ये अटक करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास केला जात आहे. Anti Corruption Bureau Latest News

एसीबी पथक
सुनिल लोखंडे सो, पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे ,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल चव्हाण पोलीस उप अधीक्षक यांनी कारवाई करत लाचखोर वन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. Anti Corruption Bureau Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0