Kondhwa Crime News | एकाचवेळी चोरीच्या तब्बल २० दुचाकी हस्तगत : कोंढवा पोलिसांची दमदार कामगिरी
kondhwa crime news
- Kondhwa Crime News | वपोनि विनय पाटणकर यांच्याकडून कारवायांचा सपाटा
पुणे, दि. २७ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Kondhwa Crime News | पुणे शहर व परिसरात दुचाकी चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष मोहीम राबविली आहे. कोंढवा पोलिसांनी एका कारवाईत तीन चोरट्यांना जेरबंद करत एकाचवेळी तब्बल २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यात २ बुलेट, ६ स्प्लेंडर, ३ अॅक्टिव्हा, १ ज्युपिटर, २ शाईन, १ ड्रिम युगा, ३ पेंशन, २ एच एफ डिल्कस या वाहनांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर Senior Police Inspector Vinay Patankar यांच्या नेत्तृत्वाखाली कोंढवा तपास पथकाने सदर दमदार कामगिरी केली आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी १) गौस मिरासाहब शेख, वय २० वर्षे, धंदा बिगारी, मुळ रा. मु. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चाजनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे २) शाहरुख कासीम शेख, वय २५ वर्षे, धंदा बिगारी, मुळ रा. मु.पो. गुंडपंत दापका, ता.मुखेड, जि. नांदेड सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चायनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे व ३) जुबेर अहमद मंगरुळे, वय २९ वर्षे, धंदा प्लंबर, मुळ रा. मु.पो. गुडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड सध्या रा. शिवनगरी पार्क, ममता स्वीटचे बाजुला, दिघी, भोसरी यांना अटक करण्यात आली आहे.
तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व पो. अं. संतोष बनसुडे व पो. अं. सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना तसेच पो.हवा. निलेश देसाई यांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण करुन संशयित वाहन चोरीचे आरोपी निष्पन्न केले. संशयित आरोपी हे ध्रुव ग्लोबल स्कुलचे मागील बाजुस मोकळ्या ठिकाणी नेहमी येत असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने सदर माहितीच्या अनुषगांने पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, संतोष बनसुडे, सागर भोसले, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सुजित मदन असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी दोन टिम तयार करून गेलो असता नमुद ठिकाणी रोडचे कडेला २ दुचाकी लागलेल्या व त्यांचेजवळ ३ इसम गप्पा मारीत असल्याचे दिसले. तेव्हा सदर इसमांना झडप मारून संशयित गौस मिरासाहब शेख, शाहरुख कासीम शेख व जुबेर अहमद मंगरुळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनांबाबत चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन सखोल तपास केला असता वरील आरोपीतांकडुन २ बुलेट, ६ स्प्लेंडर, ३ अॅक्टिव्हा, १ ज्युपिटर, २ शाईन, १ ड्रिम युगा, ३ पेंशन, २ एच एफ डिल्कस अशा एकुण २० चोरीच्या दुचाकी जप्त करून एकुण ७,३०,०००/- रुपये किमतींच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
वरील तीनही आरोपीकडुन कोंढवा पोलीस स्टेशन कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस, हडपसर पोलीस स्टेशन कडील एकुण २ गुन्हे उघडकीस, भारतीविद्यापीठ पोलीस स्टेशन कडील एकुण २ गुन्हे उघडकीस, वानवडी, मुंढवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड, या पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस व आंध्र प्रदेश भागातुन चोरी केलेली ए पी २८ बी जे ०५७२ ही दुचाकी देखील चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरिल प्रमाणे कामगिरी ही Pune Police अमितेशकुमार पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन या पथकाने केली आहे.