Central Election Commission filed in Mumbai : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळाचे मुंबईत!
Assembly Election 2024 : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर
मुंबई :- महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या Maharashtra Assembly Election 2024 तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ काल(26 सप्टेंबर) मुंबई दाखल झाले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे स्वागत केले आहे. Maharashtra Assembly Election 2024
आगामी विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने कशाप्रकारे झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी तसेच निवडणुका करिता राज्यात पोषक वातावरण आणि प्रशासन आहे का नाही याचे पाहणी करण्याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक श्रेष्ठ मंडळ राज्यात दाखल झाले आहे. आज दिवसभरात राज्यातील विविध निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज्यातील निवडणुका जाहीर होण्याची शक्यता दिसून येत आहे. साधारणतः वर्षाअखेरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Assembly Election 2024