Mumbra Murder Case : अखेर न्याय! मुंब्रा मधील 14 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडातील आरोपींला जन्मठेप
Mumbra Murder Case: Thane Court Sentences Main Accused to Life Imprisonment After 14 Years : मस्जिद ट्रस्टीच्या जागेवरून झालेल्या वादात ट्रस्टीतील पदाधिकाऱ्यांमध्ये हत्याकांड, न्यायाधीशाने एका आरोपीला सुनावली जन्मठेप
ठाणे :- “भगवान के घर देर है, अंधेर नहीं, म्हटले जाते. हे म्हण सार्थक झाली आहे. 13 डिसेंबर 2010 मध्ये कसा जामा मस्जिद च्या ट्रस्टच्या जागेवरून दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. हाच राग मनात धरून शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे यांनी मस्जिद ट्रस्टी अब्दुल गणी अब्दुल मजीद डोंगरे, मलिक सिकंदर सुरमे, लियाकत ढोले यांच्यात वाद झाला होता. हा वाद एवढा टोकाला गेला की शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे यांनी कट रचून मलिक सिकंदर सुरमे आणि लियाकत ढोले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. Mumbra Murder Case
3 डिसेंबर 2010 रोजी झालेल्या ट्रस्टीच्या जागेवरून झालेल्या वादात मलिक सिकंदर सुरमे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी यांच्या विरोधात भादवी कलम 302,307,120(ब) सह आर्म ॲक्ट 4,25 सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वी एन कारकुड त्यानंतर गुन्हे शाखा घटक-1 पोलीस यांच्याकडे प्रकरण होते. गुन्हे शाखेने ठोस पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध न्यायालयासमोर दोषारोपपत्र सादर केले होते. Thane Court Sentences Main Accused to Life Imprisonment After 14 Years
न्यायाधीशाने संपूर्ण घटनेबाबत दोन्हीही बाजूची म्हणणे ऐकून न्यायाधीश वसुधा भोसले, जिल्हा न्यायाधीश-3 ,ठाणे यांनी गुन्ह्यातील आरोपी शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे (45 वर्ष) यांना कलम 302,307 भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची आणि 13 हजार दंड शिक्षा सुनावली आहे.
गुन्हयाच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता वर्षा चंदने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, मुंब्रा पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे येथील अधिकारी, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सादिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस हवालदार गिरीश पुराणिक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि पोलीस हवालदार विद्यासागर कोळी,मुंब्रा पोलीस ठाणे यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले व त्यामुळे उपरोक्त गुन्हयातील आरोपींना दोषी ठरविण्यात यश आल्यामुळे उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस दलात व समाजातील सर्व स्तरातुन पोलीसांचे कौतुक होत आहे. Thane Court Sentences Main Accused to Life Imprisonment After 14 Years