Mumbai Drugs News : “दम मारो दम…, अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे मुंबई केंद्रबिंदू, मुंबईला अंमली पदार्थाची कीड
•Mumbai hub of drug traffickers मुंबई अंमली पदार्थाचे केंद्रबिंदू? अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई, तब्बल 22 किलो गांजा जप्त
मुंबई :- राज्यात अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई चालू असताना मुंबईत अनेक दिवसांपासून दम मारो दम.. अशी अवस्था पाहायला मिळत आहे. बघायला गेलं तर मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात अंमली पदार्थाची कीड लागली का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. तसेच ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना मुंबई अंमली पदार्थासाठी केंद्रबिंदू बनले का?असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. कारण मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवशी दोन ठिकाणी धाड टाकली असून तब्बल 22 किलो गांजा आणि 214 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या दोन युनिटने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत लाखो रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. गोरेगाव या परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिटने छापेमारी करत अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींकडून 22 किलो वजनाचा ज्याचे अंदाजे किंमत नऊ लाख रुपये असा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
बांद्रा युनिटचे अंमली पदार्थ Drugs विरोधी पथकाचे माहीम परिसरात गस्ती घालत असताना अवैधपणे एमडी विक्री करणाऱ्या एका परदेशीय नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्याच्याजवळून 110 ग्रॅम तपकिरी रंगाचा एमडी आणि 104 ग्रॅम सफेद रंगाचा एमडी असे एकूण 214 ग्रॅम वजनाचा ज्याची अंदाजे किंमत 42.2 लाख पेक्षा अधिक असा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला वरळी युनिटकडे पुढील चौकशी करिता ताब्यात दिले आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींच्या विरोधात एन.डी.पी.एस. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा,मुंबई, व सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प. वि. कक्ष, गुन्हे शाखा, कांदीवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.