Panvel News : पनवेल पत्रकारांनी दिल्ली दौऱ्या दरम्यान घेतली लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांची भेट
पनवेल पत्रकारांचा दिल्ली अभ्यास दौरा सुरु आहे या वेळी लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी याची भेट घेऊन या विभागाचे कामकाज जाणून घेतले. हि भेट घेण्यासाठी या विभागाचे सल्लागार संदीप पोखरकर यांची मोलाची मदत झाली. मंत्री महोदयांच्या व्यस्त कार्यक्रमातून हि त्यांनी हि भेट घडवली हे विशेष. या बाबत सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले. योगायोग म्हणजे मंत्री सीताराम मांझी यांचा वाढदिवस होता त्यामुळे त्यांना शुभेच्या देण्यासाठी गर्दी होती तरी सुद्धा त्यांनी १५ मिनिटे पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले कि महिलांनासक्षम कार्यांसाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. या मंत्रालया मार्फत अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजना जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी पत्रकारांनी हि या योजनांना प्रसिद्धी द्यावी असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले. या वेळी अनिल कुरघोडे, लालचंद यादव, गौरव जहागीरदार, शैलेश चव्हाण, सुनील पाटील, संतोष भगत, संतोष सुतार, सुनील वारगडा, रवींद्र गायकवाड, अण्णासाहेब अहिर, मयुर तांबडे व मनोहर पाटील उपस्थित होते.