Sanjay Raut In Jail : खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसाचा तुरुंगवास
•मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा, न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया
मुंबई :- माझगाव न्यायालयाने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय आज लागला असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसाचा तुरुंगवास सुनावला आहे. तसेच त्यांना 25000 रुपयाचा दंड सुनावण्यात आला आहे. संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात मेधा सोमय्या यांच्या अग्रलेख लिहिला होता.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
नेमकं काय प्रकरण आहे?
शिवसेनेचे मुखपत्र सामना ऑनलाइन 12 एप्रिल 2022 रोजी संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखात, “मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर परिसरातील 16 शौचालयांच्या बांधकामाचे कंत्राट घेण्यासाठी राजकीय ताकदीचा वापर केला.” या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी 3 कोटी 90 लाख रुपयांचा घोटाळा केला होता.
त्यांचा लेख समोर आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी शिवसेना खासदाराच्या लेखाबद्दल मेधा सौम्या म्हणाल्या होत्या की, या लेखामुळे मला खूप मानसिक त्रास झाला आहे. यानंतर माझे सर्व नातेवाईक आणि मित्र माझ्याकडे संशयाने पाहू लागले आहेत. ते लोक मला प्रश्न विचारू लागले आहेत.यामुळे समाजात माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली आणि माझी प्रतिमा डागाळली. या लेखानंतर मला लोकांसमोर लाज वाटू लागली. यामुळे माझी बदनामी झाली.