Mumbaiक्राईम न्यूज
Trending

Mumbai Khar Spa Sex Racket Busted | खार मधिल ‘मिझमार थाई स्पा’ हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : पीडित मुलींची सुटका

  • Mumbai Khar Spa Sex Racket Busted | मुंबई पोलीस, गुन्हे शाखा अनैतिक व्यापार प्रतिबंध पथकाकडून कारवाई
  • पडद्यामागील सूत्रधारांचा तपास होणार का ?

मुंबई, दि. २६ सप्टेंबर,
महाराष्ट्र मिरर

Mumbai Khar Spa Sex Racket Busted | मुंबईतील खार परिसरात ‘स्पा’च्या नावाखाली चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. मुंबई पोलीस, गुन्हे शाखा अनैतिक व्यापार प्रतिबंध पथकाकडून कारवाई करत ‘मिझमार थाई स्पा’ येथील सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याच Mizmar Thai Spa स्पाकडून काही वर्षांपूर्वी आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना, क्रिकेटपटू यांच्यासह बॉलिवूड मधील कलाकारांनी हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच ‘स्पा’ चे पडद्यामागील खरे सूत्रधारांचा तपास लावण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

याबाबत पोलीस शिपाई किशोर मारुती घुगे (अंमलबजावणी कक्ष) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अमरिन हसीब शेख, आलम, मुस्कान आणि श्रीमती टी. नोकसेंपेला यांच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात स्त्री मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (१९५६) ३,४,५ व बीएनएस १४३ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Police मुंबई पोलीस, गुन्हे शाखा, अनैतिक व्यापार प्रतिबंध पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता कदम यांच्या पथकाकडून सदर सापळा कारवाई करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी कि, गुन्हे शाखा, अनैतिक व्यापार प्रतिबंध पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता कदम यांना ‘मिझमार थाई स्पा’ ८ वा मजला, लिओ बिल्डिंग, लिंकिंग रोड, खार पश्चिम, मुंबई येथे सेक्स रॅकेट सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सेक्स सर्व्हिसची मागणी केली असता स्पा कडून ६,५०० रुपयात फुल सर्व्हिस ऑफर केली. यावेळी पोलिसांनी धाड टाकून सदर स्पा येथे सुरु असणारे सेक्स रॅकेट उध्दवस्त केले. यावेळी मुलींची सुटका करण्यात आली. यात एका परदेशी मुलीचा सहभाग होता.

https://bollywoodglitterati.blogspot.com/2019/05/nora-fatehi-mohammad-azharuddin-ashish.html

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0