क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Ambernath Kidnapping News : अपहरणाचे षडयंत्र पोलिसांनी लावलं उधळुन ; अंबरनाथमधील “त्या”अपहरणाचा गुंता सुटला

ओला ड्रायव्हर, महानगरपालिकेतील भरती भ्रष्टाचाराचा सस्पेन्स

अंबरनाथ :- अपहरणातील सस्पेन्स लोकांसमोर आले असून अंबरनाथ मधील अपहरण झालेल्या वीस वर्षीय बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाच्या अपहरण पोलिसांनी उधळुन लावले. Ambernath Kidnapping News सिनेमातील अपहरण कथेतील घटनेलाही लाजवेल अशी घटना अंबरनाथ मध्ये समोर आली आहे. बिल्डर संजय रंभाजी शेळके यांच्या वीस वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते. Builder Sanjay Rambhaji Shelke Son Kidnaped पोलिसांनी अपहरण Thane Police Rescue झाल्यापासून केवळ बारा तासातच मुलाची सुखरूप सुटका करून अपहरण करणाऱ्या दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 Criminal Arrested अपहरण करण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. या अपहरण कथेमध्ये पोलिसांना ओला कारच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास मदत झाली आहे. (Thane Police Rescue Kidnapped Businessman’s Son After 12-Hours)

खंडणीसाठी बिल्डरच्या 20 वर्षीय मुलाचे अपहरण,12 तासात पोलिसांनी छडा लावला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक संजय रंभाजी शेळके यांचा वीस वर्षे मुलाच्या स्विफ्ट कारचा ईरटीका गाडीने पाठलाग करून चार्म्स ग्लोबल सिटी, अंबरनाथ पूर्व येथे अडवून त्याला जबरदस्ती गाडीतून खेचून नेले. त्याला ईर्टिगा गाडी मधून अपहरण केले. त्यानंतर वडिलांना कॉल करण्यास सांगून प्रथम त्यांच्याकडे अपहरण करणाऱ्यांनी चाळीस कोटी रुपयांची खंडणी मागितली होती तसेच खंडणी न दिल्यास मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या संपूर्ण प्रकरणाबाबत संगे शेळके यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शेळके यांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन 15 पोलीस अधिकारी 80 पोलीस अंमलदार याच्या साध्या वेशातील आठ पथके तयार करण्यात आले होते. Thane Latest Crime News

पोलिसांचा फौजफाटा 15 अधिकारी आणि 80 पोलिसांचे आठ पथक

अंबरनाथ पोलिसांनी Ambernath Police Station तयार केलेले पथकाने घटनास्थळी पाहणी करून अंबरनाथ परिसरातील जवळपास वेगवेगळ्या ठिकाणाचे 45 सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक केले असता आरोपी यांनी खंडणीसाठी वापरलेला मोबाईल फोन यांच्या तांत्रिक विश्लेषण केले तसेच ईरटीका गाडीचे तांत्रिक माहिती प्राप्त केली असता ईरटीका गाडी अपहरण करताना वापरलेले नंबर प्लेट बनवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी सुरुवातीला मुलाच्या वडिलांकडे 40 कोटी रुपयांची मागणी केली होती वारंवार फोन करून सात कोटी रुपये मागणी करून शेवटी दोन कोटी रुपये खंडणी देण्याचे सांगितले. तसेच आरोपींनी ही रक्कम ओला कार मध्ये ठेवून कार नंबर त्यांना पाठवण्यास सांगितले होते. आपण झालेल्या मुलाचे जीवाचे कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये याकरिता पोलिसांनी व फिर्यादी यांनी चर्चा करून दोन कोटी रुपये देण्याचे ठरविले. Thane Latest Crime News

ओला कार ड्रायव्हरची कामगिरी

ओला कारचा साध्या वेशातील पोलिसांनी खाजगी दुचाकी आणि चारचाकी वरून पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. एमआयडीसी, बदलापूर पाईपलाईन रोड परिसरात ही ओला कार अपहरण करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालवत होता. परंतु आरोपी हे सातत्याने आपले ठाव ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना आरोपींचा मागवा घेणे कठीण जात होते. त्यामध्येच मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात असतानाच आरोपींना ओला कारचा मागवा पोलीस घेत असल्याचा संशय आल्याने पुढील काही वेळातच आपला मुलगा सुरक्षित घरी येईल असे सांगून मोबाईल फोन बंद केला. Thane Latest Crime News

खंडणीची रक्कम न स्वीकारता आरोपी फरार

आरोपी यांनी खंडणीची रक्कम न स्वीकारता निघुन गेल्याने सदर प्रकाराचे गांभिर्य वाढल्याने पोलीसांनी आरोपी यांने खंडणीसाठी केलेल्या मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास करता, मोबाईलचे लोकेशन पिसे डॅम, वासेरेगांव, पडघा, भिवंडी असे मिळुन आल्याने या लोकेशनवर पोलीसांनी जावुन सापळा रचुन परीसरात शोध घेतला असता, डॅमचे जवळ अपहरण झालेला मुलगा मिळुन आल्याने त्यास सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. Thane Latest Crime News

10 आरोपींना अटक

आरोपी यांचे मोबाईलचा तात्रिंक तपास करून आरोपी निखील राजुसिंग लबाना व्यवसाय मोबाईल सिम विक्री यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांने विनेश राजु अडवाणी यास सिम कार्ड दिल्याची माहीती दिली. त्यांनतर तपास पथकांने ताब्यात घेतलेला आरोपी याचेकडे करण्यात आलेल्या सखोल तपास व तांत्रिक माहीतीवरून एकुण 10 आरोपी अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातुन मुद्देमाल जप्त

1) KIA CARENS कार
2) गावठी स्टिलचे एक पिस्टल व तीन काडतुसे
3) एक एअर पिस्टल
4) एक सुरा
5) लाल रंगाची नायलॉन दोरी
6) काळया रंगाचे मास्क व 5 मोबाईल फोन असा एकुण 12 लाख 62 हजार 350 रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दोन आरोपींंवर महानगरपालिकेत कामाला लावतो म्हणून फसवणुकीचे गुन्हे दाखल, कोट्यावधीचा भ्रष्टाचार

आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता यातील आरोपी देविदास दत्तात्रय वाघमारे, दत्तात्रय नामदेव पवार यांनी मुंबई महानगरपालीका अंतर्गत फायरमैन भरतीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील मुलांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन त्यांचेकडुन प्रत्येकी 8 ते 10 लाख रूपये प्रमाणे एकुण 2 कोटी 75 लाख रूपये स्विकारून त्यांनी फसवणुक केलेबाबत त्यांचेविरोधात आग्रीपाडा पो. ठाणे, भा.द.वि.कलम 420,465,467,468,471,34 प्रमाणे 24 जुलै 2024 दाखल आहे. गुन्हयात ते जामीनावर असुन ते निलंबित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0