क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Kidnaping News : अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला 6 तासांत अटक; मुलाची सुखरूप सुटका

Mumbai Kidnaping News : गुन्ह्याच्या तपासात कोणतीही ठोस माहिती नसताना तपास पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीला सहा तासांत ताब्यात घेतले

मुंबई :- देवनार परिसरातून Devnar अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण Baby Kidnaping करणाऱ्या आरोपीला 6 तासांत अटक करण्यात देवनार पोलिसांना Devnar Police Station यश आले आहे. आरोपी ताब्यातून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून आरोपीने मुलाचे अपहरण का केले याबाबत पोलीस तपास करत आहेत. Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवनार पोलीस ठाण्यात Devnar Police Station 23 सप्टेंबरच्या रोजी अडीच वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचे तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 140 (1),352,351(2) भारतीय न्यायसंहिता अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ तपास करण्याबाबत दोन पथके तयार करण्यात आली होती.गुन्ह्याच्या तपासात कोणतीही ठोस माहिती नसताना तपास पथकाने तांत्रिक तपास करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला सहा तासात मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात पाठलाग करत आरोपीला मुंब्रातून ताब्यात घेतले आहे. तसेच अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी करून त्याला नवीन पनवेल येथून सुखरूप ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरटे करीत आहे. Mumbai Latest Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -6 हेमराजसिंह राजपूत, सहायक पोलीस आयुक्त, देवनार विभाग, संजय डहाके यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवनार पोलीस ठाणे बासितअली सय्यद, पोलीस निरीक्षक सुनिल घोसाळकर, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, साळुंखे, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस शिपाई देशमुख, महिला पोलीस शिपाई फापाळे यांनी केली आहे. Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0