क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Akshay Shinde Latest News: मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय शिंदे यांच्याविरुद्ध अकस्मात मृत्यू‌ आणि कलम 27 अन्वये गुन्हा दाखल

Akshay Shinde Encounter Latest Update: आरोपी अक्षय शिंदे यांच्याकडून पोलिसांच्या दिशेने तीन राउंड फायर, पोलिसांकडून बचावात्मक अक्षय वर गोळीबार!

ठाणे :- बदलापूर अल्पवयीन Badlapur Rape Case मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे Akshay Shinde याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे Police Nilesh More यांची सर्विस रिवाल्वर हिसकावून पोलीसांवर‌ केलेल्या तीन राऊंड फायर मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहे. बचावात्मक म्हणून पोलिसांकडून केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे यांनी केलेल्या कृत्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा Mumbra Police Station दाखल करण्यात आला असून या घटनेच्या संदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. Akshay Shinde Latest News Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर पोस्को कायदा अंतर्गत बदलापूर पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम 65 (2), 74, 75, 76 सह पोक्सो ॲक्ट कलम 4(2).8.10 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 65(2), 74, 75, 76 सह पोक्सो ॲक्ट कलम 4(2), 6, 8, 10, 21 (2) या गुन्हयात अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अक्षय शिंदे याच्यावर दुसऱ्या प्रकरणा संदर्भात चौकशी करिता पोलिसांकडून त्याला पोलीस ठाण्यात हजर करण्याकरिता पोलीस घेऊन जात असताना मुंब्रा बायपास जवळच पोलीस व्हॅनमध्येच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला त्यानंतर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, ठाणे यांनी मृताचा पंचनामा करण्यात आला आहे. या सर्व घटनेनंतर मयत आरोपी अक्षय शिंदे यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम 262,132,109,121 तसेच शस्त्र अधिनियमन कलम 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्यात गुन्हा व अकस्मात मृत्यूचा पुढील तपास केला जात आहे. Akshay Shinde Latest News Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0