Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक ; फुलंब्री तहसील कार्यालयातील तहसीलदारांची खुर्ची जाळली
•Chhatrapati Sambhajinagar Newsसरपंच मंगेश साबळे आणि इतर दोन साथीदारांनी तहसीलदाराच्या कार्यालयातील खुर्ची कार्यालय बाहेर आणून पेट्रोल टाकून जाळली
छत्रपती संभाजी :- मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे याकरिता अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असल्याचे पाहायला मिळत आहे. डॉक्टरांकडून उपचाराकरिता जरांगे पाटील नकार देत असताना राज्यात मराठा समाजामध्ये मोठे संतोष निर्माण झाले आहे. बीड,जालना, छत्रपती संभाजीनगर येथे मागील दोन ते तीन दिवसांपासून संमिश्र स्वरूपाचे बंद पुकारण्यात आले आहे.
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे आपल्या दोन सहकारी सोबत सकाळीच्या दरम्यान तहसील कार्यालयात आले. Maratha Reservation तहसीलदार यांच्या दालनात कोणी नसल्याने त्यांनी खुर्ची बाहेर काढली. इमारतीच्या समोर पेट्रोल टाकून खुर्ची पेटवून दिली. त्यांनी एक मराठा लाख मराठा आशा घोषणाबाजी केली. अचानक ही घटना घडली यावेळी काही कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांनी काही विरोध केला नाही. त्यानंतर काही वेळात मंगेश साबळे आपल्या सहकार्य सोबत निघून गेले.
आमचे एन्काउंटर करा सरकारने मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे Manoj Jarange यांचा बळी देयचा आहे, असा आरोप करत आमचा देखील एन्काउंटर करावे, असे आव्हान खुर्ची पेटवल्यानंतर आंदोलकांनी केले. दरम्यान, मराठा आरक्षण Maratha Reservation विषयी सरकार दखल घेत नाही म्हणून तहसीलदारची खुर्ची पेटवून निषेध केला, अशी प्रतिक्रिया सरपंच मंगेश साबळे यांनी दिली.