मुंबई

Panvel News : मुरुड बाजार पेठेमधील बाजारपेठचा राजा साखरचौथ गणपतीला भाविकांचा मोठा प्रतिसाद

पनवेल :- मुरुड बाजारपेठ Murud Bajarpeth मध्ये स्थापित बाजारपेठचा राजा समस्त मुरुडकरांचे भावनिक आकर्षण बनले.काल पासून हजारो गणेशभक्तांनी गणेश दर्शन घेतले.


काही वर्षापूर्वी हसमुख फुटरमल जैन यांच्या पुढाकाराने साखरचौथ गणेश सूरु झाला होता. यावर्षी ही प्रथा सुरु करण्यात नवतरुण मित्र मंडळ यांनी पुढाकार घेतला.विजय करंबे यांच्यासह पंकज बाथम,अवलिक पटेल,आकाश गांधी,सुमित सदरे, राजू संघवी,पंकज जैन,भावेश शाह सुनील शाह,प्रवीण गांधी, गौरव हनुमंते, दर्शन काळबेरे,कीर्ति शाह, सुधीर सिंग,राजू,अतुल जैन,सुमित सदरे, साईराज बाथम,दर्शन काळबेरे,आदित्य पारेख,सचिन शाह,आशिष बागड़े,अनीश बागड़े, साईंराज जैन, उमेश गोबरे, चंदन खोत,आशीष खोत व आदी मंडळी एकत्र आली.बाजारपेठ मित्र मंडळातर्फे कार्य निश्चित झाले. पत्रकार किरण बाथम यांनी स्थापित केलेल्या नवरात्र उत्सवच्या जागेवर गणेश स्थापना करण्याचे ठरले.त्याप्रमाणे यावर्षी मंडळाच्या प्रथम साखरचौथ गणपतीची sakharchowth Ganpati स्थापना करण्यात आली.
सुप्रसिद्ध मूर्तिकार आशिष चंद्रकांत खोत यांच्या गणेश कार्यशाळेमध्ये सुबक निर्माण केलेली गणेशमूर्ती ढोल ताशांच्या गजरामध्ये बाजारपेठ पोलीस चौकी येथील मुख्य मंडपामध्ये करण्यात आली.पहिलाच शोडशोपचार सन्मान प्रफुल्ल मोबाईलचे सिद्धेश करंबे व स्नेहल करंबे या दांपत्याला मिळाला.
काल दिवसभरामध्ये मुरुड ब्राह्मण समाजातर्फे अथर्वशीर्ष पठण, रात्री बुवा सुनील विरकूड, मुरुड यांचे सुश्राव्य भजन, सागर राऊत आणि संकल्प राऊत यांची तबला-मृदूंग जुगलबंदी असे कार्यक्रम घेण्यात आले.मुरुड-अलिबागचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सुद्धा बाजारपेठ राजाचे दर्शन घेतले आणि मंडळाला शुभेच्छा दिल्या.दोन दिवसांत हजारो लोकांनी गणेश दर्शन घेऊननव्या खूप परंपरेचे स्वागत करून समाधान व्यक्त केले. Panvel Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0