‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याला साजेशी कामगिरी ; मुंबई काँग्रेसकडून पोलिसांना सन्मानित
•मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, असलम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सन्मानित केले
मुंबई :- गणेशोत्सव दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत तसेच ईद-ए-मिलाद या सर्व हिंदू आणि मुसलमानांच्या सणांच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने मुंबई काँग्रेसकडून पोलिसांना सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड ,माजी मंत्री असलम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना सन्मानित केले आहे.’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याला साजेशी कामगिरी महाराष्ट्र पोलिसांनी नुकत्याच उत्साहात पार पडलेल्या गणेशोत्सवात बजावली. आपल्या पोलीस बांधवांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच ईद-ए-मिलाद चा सण देखील सुरक्षित वातावरणात आनंदाने साजरा करता आला. याबद्दल मुंबई काँग्रेसने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना भेटून संपूर्ण पोलीस पथकाच्या निस्वार्थ सेवेकरिता आभार प्रकट केले.