Zilla Parishad Bribe News : रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथील उप शिक्षकास वरिष्ठ लाच घेताना रंगेहाथ पकडले
Deputy teacher of Raigad Zilla Parishad Alibaug Taking Bribe : रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मागील काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई सुरू आहे. मात्र असे असले तरीही लाचखोरांची खाबुगिरी वाढतच असल्याचं दिसून येतंय. तीन शिक्षकांचे वेतन आदा करण्याकरिता प्राथमिक जिल्हा परिषद अलिबाग येथील उप शिक्षक 40 हजारांची लाच घेताना एसीबीने Raigad Anti Corruption Bureau रंगेहात अटक केलीय.
अलिबाग :- रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून Raigad Anti Corruption Bureau मागील काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई सुरू आहे. तरीही लाचखोरांची खाबुगिरी कमी होताना दिसत नाही. प्राथमिक शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद यांच्या Alibaug Zilla Parishad Bribe News तीन शिक्षकांचे वेतन सुरू करुन देण्यासाठी उपशिक्षक प्राथमिक शाळा जाताडे तालुका पनवेल सध्या समन्वयक प्राथमिक शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांना 40 हजारांची Deputy teacher of Raigad Taking 40 Thousand Bribe लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केलीय आहे.
तक्रारदार हे शिक्षक म्हणुन कार्यरत असुन, तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर तीन शिक्षक यांचे जून आणि जुलै महिना या कालावधीचे वेतन अदा करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाकडुन निघणेकरीता अमित राजेश पंडया, उप शिक्षक (प्रथामिक शाळा जाताडे, ता. पनवेल सध्या कार्यरत समन्वयक प्राथमिक शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषद, ता. अलिबाग) हे 40 हजार रूपये लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार एसीबी कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. Raigad Anti Corruption Bureau Breaking News
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पडताळणीच्या वेळी 4 सप्टेंबर च्या द दरम्यान तक्रारदार यांचेकडे पनवेल एस.टी. स्टैंड येथे चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तात्काळ स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर 4 सप्टेंबर रात्रीच्या दरम्यान अमित पंडया यांचेविरूध्द सापळा रचून एसीबी ने ताब्यात घेतले असता, लोकसेवक यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे त्यादिवशी सापळा स्थगित करण्यात आला. Raigad Anti Corruption Bureau Breaking News
काल (18 सप्टेंबर) सायंकाळी दरम्यान जुन्या मुंबई-पुणे हायवेवर खालापुर फाटा, येथे सापळा रचून अमित पंडया यांना तक्रारदार यांचेकडून चाळीस हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
खालापूर पोलीस ठाण्यात Khalapur Police Station लाचखोर उपशिक्षक अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पाडावे,पोलीस उप अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड-अलिबाग यांनी कारवाई केली आहे. Raigad Anti Corruption Bureau Breaking News