क्राईम न्यूजमुंबई

अंबरनाथ : मजुरीच्या वादातून मुकादमाची हत्या, मजुराने आजारी मुलाच्या उपचाराकरिता मागितले होते पैसे

Ambernath Murder News : मुकादम यांने 900 रुपयांची मजुरी देण्याचे कबूल करून केवळ 700 मजुरी देत होता

अंबरनाथ :- हाल्याचापाडा अंबरनाथ Ambernath City पूर्व येथे इमारतीचे काम करण्यासाठी बंगालमधून दोन मजूर अब्दुल अकालू रहमान (37 वर्ष) या लेबर मुकादमने आणले होते. त्यामधील सलीम याकुब शेख (49 वर्ष ) याला 900 रुपये रोजंदारीवर कामासाठी ठेवले होते. परंतु मुकादम अब्दुल अकालू रहमान हा 900 ऐवजी फक्त सातशे रुपये मजुरी देत होता. या मजुरीच्या वादातून मजूर सलीमेने मुकदम अब्दुल याला जीवे ठार मारल आहे. Ambernath Murder News तसेच सलीम याचा मुलगा आजारी असल्याने मुकादम कडे पैशाची मागणी केली होती. परंतु मुकादम पैसे ला वारंवार टाळत असल्याने हाच राग मनात धरून मजुराने मुकादमची हत्या केली जी घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे. Ambernath Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बांधकामाची मजुरी देण्यावरून झालेल्या वादातून मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अंबरनाथ पूर्वेतील वडवली सेक्शनमध्ये इमारत पुनर्विकासाच्या कामासाठी मुकादम अब्दुल रेहमानने पश्चिम बंगालमधून दोन मजूर आणले होते. बांधकामाच्या ठिकाणावरच एका गाळ्यात रेहमान दोघा मजुरांसोबत राहात होता. त्यांना दररोज 900 रुपये मजुरी देण्याचे कबूल करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात 700 रुपये मजुरी दिली जात होती. याच कारणावरून रविवारी पहाटे दोघांच्यात झालेल्या वादावेळी सलीम शेखने अब्दुल रेहमानच्या डोक्यात हातोडा घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी रेहमानचा घटनास्थळावर मृत्यू झाला. याप्रकरणी मोहम्मद तौरत अली (34 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बी एन एस कलम 103 (1) प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सलीम शेखला पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे. Ambernath Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0