Crime Reels | गजा मारणेनंतर आता कोणाचा नंबर ? : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सर्जिकल स्ट्राईकने गुंडांमध्ये धास्ती
- Crime Reels | गुन्हेगारांच्या रिल्स वायरल करणारे गुन्हे शाखेच्या रडारवर
पुणे, दि. १५ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Crime Reels
सोशल मीडियाच्या इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सअप, यु ट्यूब ऍपवर गुन्हेगारांचे रिल्स वायरल करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Ameteesh Kumar यांनी याबाबत सर्जिकल स्ट्राईक करण्याचे संकेत दिले होते. दि. १४ रोजी दुपारी गुन्हे शाखेने थेट कुख्यात गजा मारणे Gangster Gaja Marne याला रिल्सबाबत विचारणा करण्यासाठी बोलावले. यावेळी ४ तासांच्या चौकशीत गजा मारणे याला पोलिसी भाषेत सज्जड दम देण्यात आल्याचे समजते. पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने गजा मारणेनंतर आता कोणाचा नंबर ? अशी धास्ती भाई लॊकांमध्ये पसरली आहे.
गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण नको : पोलीस आयुक्त अमितेश कुमार
गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या रिल्समुळे युवा वर्ग गुन्हेगारी कृत्याकडे आकर्षित होत आहे. कुख्यात गुन्हेगारांकडून युवकांचा होत असलेला वापर थांबविणे गरजेचे असल्याने पोलीस आयुक्तांनी विधायक पाऊल टाकत गुन्हेगारी रिल्सवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे.
गजा मारणे झाला, आता कोणाचा नंबर
पुण्यात गलोगल्लीत भाई, आणि भाऊ अस्तित्वात आहेत. प्रत्येकजण आपण किती मोठा भाई आहे हे दाखविण्यासाठी रिल्सचा वापर करतात. याच रिल्समुळे भाई लोकांची भाईगिरी शाबूत राहते. परंतु पुणे पोलिसांकडून थेट कुख्यात गजा मारणेलाच चौकशीसाठी बोलविण्यात आल्याने शहरातील भाई लॊकांमध्ये धास्ती पसरली आहे.
Crime Reels | Who’s number now after hitting Gaja? : Police Commissioner Amitesh Kumar’s surgical strike scares gangsters