Uncategorized
Trending

Thane Fraud Doctor: पैशांसाठी डॉक्टरांकडून रुग्णांची लुट? आयुर्वेदिक थेरपी मधील काळाबाजारचा होणार पर्दाफाश?

Thane Fraud Doctor News : हाउसकीपिंग कर्मचाऱ्यांकडून केले जाते उपचार, डॉक्टरांवर यापूर्वीच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे

ठाणे :- डॉक्टरला देवाचे Thane Fraud Doctor News दुसरे रूप मानले जाते. रुग्णांवर योग्य उपचार करणे हे डॉक्टरांचे परम कर्तव्य आहे. परंतु डॉक्टरांकडूनच लालसापोटी जेव्हा रुग्णांची पैशासाठी लूट केली जाते तेव्हा डॉक्टरांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. पैशाच्या लोभा पोटी डॉक्टरांकडून लूट करणाऱ्या काळाबाजार ठाण्यातील Thane Fraud एका नामांकित आयुर्वेदिक थेरेपी क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टराचा पर्दाफाश “महाराष्ट्र मिरर” वृत्तसंस्थेने Maharashtra Mirror उघडकीस आणला आहे. शासनाचे वैद्यकीय क्षेत्र संदर्भातील नियम धाब्यावर बसून चक्क हाउसकीपिंग चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना थेरपीची उपचार (ट्रीटमेंट) केले जाते. याचा धक्कादायक प्रकार ठाण्याच्या टेंभी नाका Thane परिसरात असलेल्या पारसनाथ स्पेशलिटी क्लीनिक Parasnath Specialists Clinic आणि आयुर्वेदिक क्लिनिक यांचा उघडकीस आणला आहे. Thane Crime News

पारसनाथ स्पेशालिस्ट क्लीनिक आणि आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये काळाबाजार, पैशांसाठी स्वस्तातले औषधे महागडी करून विकली जातात

ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात असलेल्या पारसनाथ स्पेशलिटी क्लीनिक आणि आयुर्वेदिक क्लिनिक या रुग्णालयात पैशांसाठी रुग्णांची लूट केली जाते. प्रत्येक ट्रीटमेंट साठी 70 ते 80 हजार रुपये रुग्णांकडून घेतले जातात. यामध्ये प्रामुख्याने थेरेपी (मसाज) द्वारे रुग्णांवर उपचार केले जातात परंतु ते उपचार करण्याकरिता असलेले साधनसामुग्री अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. पारसनाथ स्पेशालिस्ट क्लीनिक आणि आयुर्वेदिक क्लिनिक यांच्या संचालक डॉक्टर भालचंद्र महामुनी यांच्यावर यापूर्वी फसवणुकीचे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. तसेच, डॉक्टरांच्या पदवीवरही शंका उपस्थित आहे. या डॉक्टरांची पदवी बोगस आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. उपचाराकरिता रुग्णांना दिले जाणारे औषधे अतिशय कवडीमोलाने उल्हासनगर येथून खरेदी करतात जे औषधाची 20 आणि 40 रुपये किंमत आहे त्याला शंभर पटीने वाढवून औषधे 400 ते 500 रुपयांनी विक्री केली जाते. त्यामुळेच या रुग्णालयावर वैद्यकीय विभागातून कारवाई होणार का? डॉक्टरांच्या पदवी बाबत आणि आयुर्वेदिक थेरपी सेंटरची पाहणी होऊन कायदेशीर कारवाई होणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. Thane Crime News

रुग्णांवर उपचार कशाप्रकारे होतात लवकरच क्रमशः

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0