Mumbai University Senate Elections : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीपूर्वीच
Mumbai University Senate Elections: : 10 जागांसाठी लढविण्यात येणार निवडणुक होणार आहे.22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून त्याचा निकाल 25 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election मुंबई विद्यापीठाच्या Mumbai University Senate Elections 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता 22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. 10 जागांवरील निवडणूकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे.विद्यापीठाच्या दहा सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. यापैकी पाच जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत, तर उर्वरित पाच जागा एससी, एसटी, ओबीसी आणि इतर प्रवर्गासाठी राखीव आहेत.निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रसाद कारंडे म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व स्तरातून सहकार्याची आवश्यकता असून निवडणुकीची तारीख 25 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. Mumbai University Senate Elections Latest Update
सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव गट (ठाकरे) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात रंजक लढत पाहायला मिळणार आहे. उद्धव सेनेची विश्वासार्हता पणाला लागली असतानाच भाजप शिंदे सेनेशी लढण्याचा प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. Mumbai University Senate Elections Latest Update
मुंबई विद्यापीठाच्या https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार त्यांच्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि बुथ क्रमांक पाहू शकतील. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणूकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. 38 केंद्र आणि 64 बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. Mumbai University Senate Elections Latest Update