- टॅक्सी चालकाशी बोलत असताना मोबाईल हिसकावला होता
पुणे, दि. १४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Pune News
घरी जाण्यासाठी ओला टॅक्सी बुक करुन टॅक्सी चालकाशी बोलत असताना फिर्यादी यांचा मोबाईल हिसका मारून चोरण्यात आला होता. सदर चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्याकडून ४ मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Pune News
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी सार्थक किशोर जाधव वय २५ वर्षे, व्यवसाय नोकरी रा मोहन नगर कॉलनी, सदगुरु प्रेस्टीज, फ्लॅट नं.१. धनकवडी, पुणे हे घरी जाणेकरीता ओला टॅक्सी बुक करुन टॅक्सी चालकाशी बोलत असताना पाठीमागुन काळे रंगाचे अॅक्टीव्हा गाडी वरुन आलेल्या चोरट्याने मोबाईल हिसकावुन पळ काढला होता. बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २५०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४ (२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. Pune News
यातील आरोपीचा तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता, पो.अं.९८६७ बडे, पो.अं.१२००३ भोकर, पो.अ.१०२०८ सरक, पो.अं.१०२५३ संकपाळ, पो.अं.८८९९ गायकवाड, पो. अं. केकाण असे शोध घेत असताना त्याचे संशयित शकील शब्बीर शेख, वय २२ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे असे समजलेने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे बंडगार्डन पोलीस वाणे गु.र.नं. २५०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४ (२) या दाखल गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता सदरचा दाखल गुन्हा त्याने केल्याची कबुली दिल्याने पंचा समक्ष त्याचे ताब्यातील अॅक्टीवा मो. सायकल चे डिक्कीमधुन गुन्हयातील हिसकावुन चोरी केलेला मोबाईल फोन व इतर ४ चोरीचे मोबाईल फोन गुन्हयात वारलेली अॅक्टीवा मो. सायकल असा एकुन १,२५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, दिपक निकम सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, श्रेणी पो. उपनिरी मोहन काळे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, मनिष संकपाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास केकान यांचे पथकाने केली.