क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune News | विश्रांतवाडीत चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आला आणि पोलिसांनी…

  • चोरट्यांकडून महागडा मोबाईल हस्तगत Pune News

पुणे, दि. १३ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी

Vishrantwadi विश्रांतवाडी चौकात चोरलेला मोबाईल विक्रीसाठी आलेल्या चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले आणि दुचाकीवरून पळून जाणाऱ्या चोरट्याला त्याच्या अल्पवयीन साथीदारांसह ताब्यात घेतले आहे. Pune News

संशयित अर्जुन नामदेव राठोड, वय १९ वर्षे, रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव पुणे मुळ गाव मु पो कांगडगी तांडा, पोस्ट आलू, ता. जेऊरगी, ता गुलबर्गा, राज्य कर्नाटक याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा अलपवयीन साथीदार ताब्यात घेण्यात आला आहे.

Vishranwadi Police Staff with mobile thef.

दि. १०/०९/२०२४ रोजी तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड व तपास पथकाचे अंमलदार असे पोलीस स्टेशनचे हददीत गणेशोत्सवाचे अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे पोलीस हवालदार अमजद शेख व संजय बादरे यांना त्यांचे बातमीदारांडून बातमी मिळाली की, धानोरी रोडवरील खदानीचे जवळ पल्सर मोटार सायकलवर दोन इसम संशयीतरित्या थांबले आहेत अशी खात्रीशीर बादमी मिळाल्याने बातमी प्रमाणे खात्री करण्यासाठी वरील सर्व अंमलदार गेले असता दोन इसम पोलीसांना पाहून त्यांचेकडील पल्सर गाडीवरुन पळून जावू लागल्याने व सदर मोटार सायकलला पाठीमागील बाजूस नंबर प्लेट नसल्याने पोलीसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचेकडे बारकाईने चौकशी करता त्यांनी त्यांची नावे १) अर्जुन नामदेव राठोड, वय १९ वर्षे, रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव पुणे मुळ गाव मु पो कांगडगी तांडा, पोस्ट आलू, ता. जेऊरगी, ता गुलबर्गा, राज्य कर्नाटक २) विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगीतले. सदर इसमांकडे चौकशी करुन आरोपी अर्जुन राठोड याची अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे डावे खिशात एक काळया रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट मिळून आल्याने व त्यामध्ये सिमकार्ड नसल्याने त्यास मोबाईलबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा मोबाईला हा दि. ०७/०९/२०२४ रोजी रात्रौ ०२.०० वा चे सुमारास धनेश्वर शाळा, मुंजाबावस्ती येथे एक इसम रस्त्याने मोबाईलवर बोलत चालला असताना पाठीमागून मोटार सायकलवरून येवून त्या इसमाचे हातातील मोबाईल हिसकावून घेवून गेलो होतो व तो मोबाईल विकण्यासाठी आम्ही आज विश्रांतवाडी चौक या ठिकाणी आलो होतो परंतू तेथे पोलीस दिसल्याने आम्ही परत लोहगाव येथे चाललो होतो असे सांगीतले. आरोपी अर्जुन र्जन नामदेव नाम राठोड यास गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटार सायकल असा एकुण १,१२,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0