Mumbai Police : मुंबई पोलिसांची देवदूत कामगिरी ; समुद्रात बुडणाऱ्या दोन तरुणाचे वाचविले प्राण
Mumbai CP Vivek Phansalkar Shared Mumbai Police video : पोलीस आयुक्तांकडून कौतुक व्हिडिओ केला शेअर
मुंबई :- मुंबई पोलीस Mumbai Police दलातील चार पोलिसांनी देवदूताची कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. कार्टर रोड इथल्या समुद्रात बुडणाऱ्या एका व्यक्तीला तिथं गस्तीवर असलेल्या चार पोलीस कर्चमाऱ्यांनी वाचवलं. या व्यक्तीला पाण्याबाहेर काढून त्याला प्रथमोपचार दिले आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या या कामगिरीला दाद देताना मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी Mumbai CP Vivek Phansalkar कौतुक केलं आहे. याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला.
कर्तव्यावर असलेले खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू गायकवाड, हेड कॉन्स्टेबल विकास बाबर, पोलीस कॉन्स्टेबल रमेश वाळवी आणि पोलीस कॉन्स्टेबल मोकशी यांनी समुद्रात उडी घेत दोन जणांचे प्राण वाचवले.
तरुणाला वाचवतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसंच पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खोल समुद्रात उडी घेण्यासही पोलीस सज्ज आहेत. एका बुडत्याला तातडीनं प्रतिसाद देत त्याचा जीव चार पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचवला आहे. कार्टर रोड इथं ही दुर्घटना घडली होती.