क्राईम न्यूजठाणे
Trending

Thane Fruad News : टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून लाखोंची ऑनलाईन फसवणूक

Thane Telegram Fruad News : शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध

ठाणे :- आशुतोष कुमार मनोरंजन तिवारी (29 वर्ष) यांची टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून 24 लाख 66 हजार 225 रुपयाची ऑनलाइन फसवणूक Thane Fraud News झाल्याची घटना शिळ डायघर पोलीस ठाण्यात Shil Daighar Police दाखल करण्यात आली आहे. सायबर पोलिसांकडून Thane Cyber Police फसवणूक केलेल्या या टेलिग्राम ग्रुपच्या Telegram Fraud Group शोध घेतले जात आहे. Thane Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडले गाव येथे राहणाऱ्या अशितोष कुमार मनोरंजन तिवारी यांना टेलिग्राम वरून टेलिग्राम ॲप मधील शॉपर अपलोड या ग्रुपमध्ये विविध उत्पादन रेटिंग व आयपीओ याबद्दल माहिती दिली. त्यानंतर खरेदी-विक्री केल्यास अधिकचा नफा मिळाल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आशुतोष कुमार यांनी त्या ॲपद्वारे तब्बल 24 लाख 66 हजार 225 रुपयांची शेअर्स खरेदी केले होते. तसेच यावर मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असे अमिष दाखवले होते. परंतु कोणत्याही प्रकारे गुंतवणूक केलेले पैसे आणि नफ्याचे पैसे न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध भादवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करत आहे. Thane Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0