Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी सागर पवार जेरबंद
- Vanraj Andekar Murder : गुन्हे शाखेकडून कारवाई
पुणे, दि. १२ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Vanraj Andekar Murder
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर Vanraj Andekar हत्या प्रकरणात फरार असणारा गुन्हेगार सागर पवार याला जेरबंद करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तर साहिल दळवी याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
वनराज आंदेकर हत्येनंतर सागर पवार हा फरार झाला होता. आंदेकर टोळीतील सागर पवार हा महत्वाचा चेहरा होता. कोमकर, गायकवाड आणि सागर पवार यांच्यातील कनेक्शन पोलिसांनी तपासले आहेत. तपासामध्ये ३ पीस्टल व ३ जिवंत राऊंड जप्त केलेली आहे. आत्तापर्यंत एकूण ८ पिस्तल आणि १३ राऊंड, ७ दुचाकी, एक क्रेटा कार आजतागायत जप्त केली आहे. आरोपी संगम वाघमारे यास १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.
वनराज खून प्रकरणी आजतागायत ३ अल्पवयीन विधिसंघर्षित समवेत एकूण २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.
सदरची कारवाई युनिट १ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे, सहाय्यक पोलीस फौजदार मकरे, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व निलेश साबळे यांनी केली.